पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:52 AM2018-12-20T07:52:18+5:302018-12-20T07:53:11+5:30

महाराष्ट्र केसरीच्या थरारास प्रारंभ : राज्यभरातून ९०० पहिलवानांचा सहभाग

Pune's dreamer Shelar, Sachin of the suburb, Sachin Patil | पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष

पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष

googlenewsNext

जयंत कुलकर्णी 

जालना : आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा स्वप्नील शेलार, मुंबई उपनगरचा सचिन पाटील, कोल्हापूरचा भरत पाटील, लातूरचा दत्ता भोसले यांनी गादी गटातील ५७ किलो वजन गटात तिसरी फेरी गाठली आहे.
७९ किलो वजनाच्या गादी गटात नांदेडचा सोमनाथ कोरके, मुंबईच्या अभिषेक तुर्केवाडकर, हिंगोलीचा भानुदास जाधव, रायगडचा रुपेश पावसे, अहमदनगर शहरचा अब्दुल शोएब, उस्मानाबादचा किरण जवळगे, पुणे जिल्ह्याचा अभय चोरगे यांनी तिसरी फेरी गाठली आहे.
बुधवारी दुपारी ४.३० वाजता ७९ व ५७ किलो वजनाच्या माती व गादी गटातील कुस्त्या रंगल्या. जबरदस्त चैतन्यपूर्ण वातावरणात सुरु झालेल्या या स्पर्धेला बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात झाली. या वेळी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, विलास कथुरे, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, जालना जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, सरचिटणीस दयानंद भक्त, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, आदींची उपस्थिती होती. राज्यभरातून ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले.

यांच्यात असणार महाराष्ट्र केसरी किताबासाठी चुरस
प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची प्रतिष्ठेची गदा मिळवण्यासाठी प्रत्येक पहिलवान उत्सुक आहे. गतवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा पुणे येथील अभिजीत कटके यावेळेसही आखड्यात उतरत आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारेचा भाऊ गोकूळ आवारे हादेखील विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
या दोघांशिवाय सोलापूरचा गणेश जगताप, सोलापूरचा माऊली जमदाडे, कोल्हापूरचा कौतुक ढापके, नाशिकचा हर्षल सदगीर, कोल्हापूरचा बाळा रफिक शेख, जालना येथील अक्षय शिंदे, अहमदनगरचा विष्णू खोसे हे पहिलवान महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

विशेषत: गतवर्षीचा ‘महाराष्ट्र केसरी’ पै.अभिजित कटके याच्यावर सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष असणार आहे. पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिजीतने दोन वेळा ह्यमहाराष्ट्र केसरीह्णच्या अंतिम फेरीत धडक मारली होती व गतवर्षी किरण भगत वर मात करत त्याने प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती. त्याला शिवराज राक्षे, बीडचा अक्षय शिंदे, नगरचा विष्णू खोसे, कोल्हापूरचा कौतुक डाफळे, महेश वरुटे, बालारफीक शेख, गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर यांच्याकडून अभिजीतला तगडा आव्हान मिळू शकते.

७९ किलो (माती गट - पहिली फेरी) : कृष्णकांत कांबळे (कोल्हापूर) वि. वि. मोईन सय्यद (जालना), आदेश चौधरी (ठाणे जि.) वि. वि. सिद्धेश पाटील (रायगड), किरण बककुडे (सातारा) वि. वि. निखील उंद्रे (पुणे), (मुंबई) वि. वि. विशाल मिश्रा (अकोला), अजित शेळके (अहमदनगर) वि. वि. अजयकुमार यादव (मुंबई).
५७ किलो (गादी गट : दुसरी फेरी) : भोलानाथ साळवी (कल्याण) वि.वि. सूरज ढेरगे (बीड), भरत पाटील (कोल्हापूर) वि.वि. भालचंद्र कुंभार (पुणे शहर), ज्योतीबा अटकळे (सोलापूर) वि.वि. दर्शन निकम (धुळे), अमोल फितवे (अकोला) वि.वि. कार्तिक शेलार (मुं. उपनगर).
५७ किलो (माती) : अक्षय भोईर (कल्याण) वि. वि. प्रवीण गोडसे (सातारा), हरी अंबेकर (नाशिक) वि. वि. अक्षय गिरी (वाशिम), संतोष हिरगुडे (कोल्हापूर शहर) वि. वि. श्रीनाथ पाटील (रायगड).

कुस्ती स्पर्धेचे निकाल
७९ किलो (दुसरी फेरी गादी गट) : सोमनाथ कोरके (नांदेड) विजयी वि. अल्ताफ शेख (औरंगाबाद), अभिषेक तुर्केवाडकर (मुंबई पश्चिम) वि. वि. वैभव तागडे (पुणे शहर), भानुदास जाधव (हिंगोली) वि. वि. मयूर बावनकर (भंडारा-अनुपस्थित), रुपेश पावसे (रायगड) वि. वि. निखील वाकोडे (अकोला), अब्दुल शोएब (अहमदनगर) वि. वि. कुंभार भांगरे (नाशिक शहर), चेतन बोडखे (बुलढाणा) वि. वि. राहुल काटकर (नागपूर), किरण जवळगे (उस्मानाबाद) वि. वि. चेतन वाणी (चंद्रपूर).

Web Title: Pune's dreamer Shelar, Sachin of the suburb, Sachin Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.