दिल्लीने बिघडवले पुण्याचे गणित

By admin | Published: May 13, 2017 02:58 AM2017-05-13T02:58:39+5:302017-05-13T06:11:58+5:30

आयपीएलच्या या सत्रात क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्यासाठी अव्वल दोन स्थानांवर राहण्याचे प्रयत्न करणाऱ्या पुणे

Pune's mathematics spoiled | दिल्लीने बिघडवले पुण्याचे गणित

दिल्लीने बिघडवले पुण्याचे गणित

Next

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 -  आयपीएलच्या या सत्रात क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्यासाठी अव्वल दोन स्थानांवर राहण्याचे प्रयत्न करणाऱ्या पुणे सुपरजायट्ंचे गणित करुण नायरने बिघडवले. नायरच्या दमदार अर्धशतकी खेळी आणि जहीरच्या दोन बळींच्या
कामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने पुणे सुपरजायंट्सवर ७ धावांनी विजय मिळवला.


दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र अखेरचे सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे काम दिल्लीचा संघ करत आहे. दिल्ली डेअरडेविल्सने कोटला स्टेडिअमच्या खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र संजू सॅमसन पुन्हा एकदा धावबाद झाला. गेल्या सामन्याचा हिरो श्रेयस अय्यर हा जयदेव उनाडकटचा बळी ठरला.
दिल्लीचा डाव करुण नायर (६४) आणि रिषभ पंत (३६ ) यांनी सांभाळला. आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मार्लोन सॅम्युअल्स, पॅट कमिन्स, अमित मिश्रा यांच्या छोट्या पण उपयुक्त खेळीने दिल्लीने १६८ धावा केल्या.


युवा करुण नायरच्या दमदार फलंदाजीनंतर अनुभवी जहीर खानने आपला भेदक स्पेल टाकला. पहिल्याच चेंडूवर त्याने पुणे सुपरजायंट्सच्या अनुभवी अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर त्यानेच युवा आणि धोकेदायक फलंदाज राहूल त्रिपाठीला बाद करत पुण्याच्या अडचणीत आणले. पण कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि बढती मिळालेल्या अष्टपैलु मनोज तिवारी यांनी डाव सांभाळला. स्टोक्स आणि तिवारी यांच्या भागिदारीने पुण्याला बळ मिळाले. मात्र अखेरच्या काही षटकांत शमीने बेन स्टोंक्स आणि डॅनियल ख्रिस्तीयन यांना बाद करत पुण्याला बॅकफुटवर ढककले. येथेच सामना पुन्हा दिल्लीच्या बाजुने फिरला.
अखेरच्या षटकांत पुण्याला विजयासाठी २५ धावांची गरज होती. मनोज तिवारी याने कमिन्सला सलग दोन षटकार मारत विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र पॅट कमिन्स पुढच्या चार चेंडूंत फक्त पाच धावा देत मनोज तिवारीला रोखले.


या सामन्यानंतर पुणे संघ तिसऱ्या स्थानावर १६ गुणांसह कायम आहे. क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्याचे त्यांचे गणित आता जर तरवर अवलंबून आहे. शनिवारच्या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा पराभव केला. तर पुणे पुन्हा दुसऱ्या स्थानावर जाईल. मात्र जर कोलकाताने मुंबईला पराभूत केले. तर कोलकाता पहिल्या आणि मुंबई दुसऱ्या स्थानावर असेल. त्यातही सनरायजर्सने उद्याच्या सामन्यात गुजरात लायन्सला पराभूत केले तर सनरायजर्स गुणतक्त्यात १७ गुणांसह तिसऱ्या किंवा दुसऱ्या स्थानावर जाईल. तेव्हा पुण्याचे गणित बिघडू शकते.

Web Title: Pune's mathematics spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.