पुणे की मुंबई?

By admin | Published: May 21, 2017 01:27 AM2017-05-21T01:27:52+5:302017-05-21T05:34:03+5:30

तिसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-१० च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचे अवघड आव्हान राहील.

Pune's Mumbai? | पुणे की मुंबई?

पुणे की मुंबई?

Next

हैदराबाद : तिसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-१० च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचे अवघड आव्हान राहील. महाराष्ट्रातील या दोन्ही संघांची झुंज अर्थात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. सामन्याच्यानिमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ वाटतात. पण प्रत्यक्षात पुण्याने यंदा मुंबईला तीनदा धूळ चारली आहे. फायनल मात्र नव्याने खेळली जाणार असल्याने सर्व पराभवांचा वचपा काढण्याची मुंबईला सुवर्णसंधी असेल. दोन वेळेचा विजेता मुंबई संघ एकूण चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, अंबाती रायुडू यांना फायनल कशी जिंकायची, हे चांगले ठाऊक आहे. २०१३ आणि २०१५ च्या विजेत्या संघातही हेच खेळाडू होते. मुंबईची ताकद त्यांची राखीव फळी आहे. जोस बटलरचे स्थान लेंडल सिमन्सने घेतले. मिशेल जॉन्सनच्या जागेवर मिशेल मॅक्लेनघन आला असून त्याने १९ गडी बाद केले आहेत. नितीश राणा याने ३३३ धावा काढल्या. तो यंदाच्या स्पर्धेचा स्टार मानला जातो. जखमेतून सावरलेला रायुडू अधिक प्रभावी दिसतो. हरभजनसिंग अनुभवी असला तरी व्यवस्थापनाने कर्ण शर्मावर अधिक विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)

- स्मिथला धोनीच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. सनरायझर्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ अशा लढतीत धोनीने अनुभव पणाला लावून फलंदाजी केली. मुंबईविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये पाच षटकार खेचून सामन्याचे चित्र पालटले. पुण्याचा संघ पुढील मोसमात राहणार नसल्याने धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जच्या पिवळ्या टी शर्टमध्ये खेळताना दिसेल, अशी दाट शक्यता आहे.

- पुणे संघाच्या नेतृत्वावरून उचलबांगडी झाल्याचा अपमान तो विसरला नसावा. म्हणूनच अखेरचा सामना संस्मरणीय ठरविण्याची जिद्द धोनीला लागली असावी. पुणे संघाला बेन स्टोक्सची उणीव भासणार. तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी इंग्लंड संघात परतला आहे. राहुल त्रिपाठीने ३८८ धावा ठोकल्या असून वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत कसब दाखविले आहे.

- पुणे व मुंबई यांच्यात गेल्या दोन वर्षांत पाच सामने झाले आहेत. यामध्ये पुण्याने ४, तर मुंबईने एकवेळा विजय नोंदवला आहे.

यातून संघ निवडणार...
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, जोस बटलर, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गोथाम, एसेला गुणरत्ने, हरभजनसिंग, मिशेल जॉन्सन, कुलवंत के, सिद्धेश लाड, मिशेल मॅक्लेनघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लेंडल सिमन्स, टीम साऊदी, जगदीश सुचित, सौरभ तिवारी, विनय कुमार.

रायझिंग पुणे सुपरजायंट : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, अशोक डिंडा, मयंक अग्रवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैस, रजत भाटिया, दीपक चहर, राहुल चहर, डेन क्रिस्टियन, लोकी फर्ग्युसन, जसकरण्सिंग, उस्मान ख्वाजा, सौरभ कुमार, बेन स्टोक्स, वॉशिंग्टन सुंदर, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, अ‍ॅडम झम्पा, जयदेव उनाडकट, ईश्वर पांडे, राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकूर.

Web Title: Pune's Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.