केकेआरसमोर पुण्याचे १६१ धावांचे लक्ष्य

By admin | Published: April 24, 2016 09:20 PM2016-04-24T21:20:47+5:302016-04-24T21:20:47+5:30

अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर १६१ धावांचे आव्हन ठेवले आहे.

Pune's target of 161 against KKR | केकेआरसमोर पुण्याचे १६१ धावांचे लक्ष्य

केकेआरसमोर पुण्याचे १६१ धावांचे लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, २४ - अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर १६१ धावांचे आव्हन ठेवले आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. मुंबईकर अजिंक्य रहाणे आज पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. कठीन परिस्थितीत त्यांने अर्धशतक केले. रहाणेने ५२ चेंडूचा सामना करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६७ धावांचा खेळी केली. फाफ डू प्लेसीस (४) ला आज साजेशी खेळी करता आली नाही. स्मिथ आणि रहाणे यांनी ३ दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदीरू केली. दोघांचा जम बसला होता पण दुर्देवीरित्या स्मिथ धावबाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. परेरा आणि मॉरकेल यांनी प्रत्येकी ९ चेंडू खेळले आणि अनुक्रमे १२ , १६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात धोनीने आक्रमक २३ धावांचा नाबाद खेळी केली. केकेआरकडून नरेन, शाकिब, यादव आणि सचिनने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

Web Title: Pune's target of 161 against KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.