पंजाबच्या सांघिक कामगिरीचा विजय

By Admin | Published: April 23, 2017 11:47 PM2017-04-23T23:47:52+5:302017-04-23T23:47:52+5:30

किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमातील तिसरा विजय गुजरात लायन्सवर मिळवला.

Punjab beat team-mate | पंजाबच्या सांघिक कामगिरीचा विजय

पंजाबच्या सांघिक कामगिरीचा विजय

googlenewsNext

आकाश नेवे/आॅनलाइन लोकमत
राजकोट, दि. 23 -  किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमातील तिसरा विजय गुजरात लायन्सवर मिळवला. पंजाबला या सत्रात सांघिक कामगिरी प्रत्येक सामन्यात करता आली नाही. मात्र या वेळी कर्णधार मॅक्सवेल याने ही भट्टी जुळवली. त्याचा परिणा सामन्याच्या निकालावर दिसला. पंजाबने गुणतक्त्यात तळाशी असलेल्या लायन्सला पराभूत केले.

आमलाने या आधी मुंबई इंडियन्स विरोधात शतक झळकावले होते. मात्र गोलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. आजचा सामनाही फक्त फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असा होणार असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात मात्र तसे फारसे दिसले नाही. आमलाच्या अर्धशतकानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोहित शर्मा आणि के सी
करिअप्पा यांच्या स्पेलमुळे गुजरात लायन्स मागे पडले.

धोकादायक मॅकक्युलमला संदीप शर्माने पहिल्याच षटकांत बाद केले. फिंच आणि रैना बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक याने दिलेली झुंज अपयशी ठरली. अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी या सामन्यात महत्त्वाची ठरली. त्याने १७ चेंडूूतच ३४ धावा केल्या. तर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना आणि ड्वेन स्मिथला बाद करत गोलंदाजीतही दम दाखवून दिला. या सामन्यात सर्र्वात लक्षवेधी ठरले ते आमलाचे अर्धशतक. या अर्धशतकासोबतच त्याने आॅरेंज कॅप पटकावली. या शर्यतीत त्याने सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. त्याने या सत्रात २९९ धावा केल्या आहेत. गुजरात लायन्सचा नाथु सिंह याचा स्पेलदेखील या सामन्यात भेदक ठरला. १४०च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या नाथु सिंह याने २ षटकांत फक्त ७ धावा देत १ गडी बाद केला. त्यानंतर त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही. त्याचा फटका गुजरातला अखेरच्या षटकांत बसला.

Web Title: Punjab beat team-mate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.