CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:40 PM2022-08-03T17:40:14+5:302022-08-03T17:40:28+5:30

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.  

Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games | CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

googlenewsNext

नवी दिल्ली : बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण १४ पदकांची नोंद झाली आहे. १४ मधील ९ पदक वेटलिफ्टिंगमधून मिळाली असून यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये ७१ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावणाऱ्या हरजिंदर कौरला पंजाब सरकार ४० लाख रूपयांचे बक्षीस देणार आहे. नायजेरियाकडून सुवर्णपदकाची दावेदार असलेली जॉय इजे क्लीन ंड जर्कच्या तीनही प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्याने हरजिंदरचे कांस्यपदक निश्चित झाले. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत यांनी हरजिंदरचे कौतुक केले. तसेच पंजाब सरकारने तिला ४० लाख रूपयांच्या बक्षीसाची घोषणा देखील केली. "नाभाची रहिवाशी असलेल्या हरजिंदर कौरला पंजाब सरकारच्या क्रीडा विभागाकडून ४० लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल. हरजिंदर सिंगने मिळवलेले हे यश भविष्यातील खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे", असे ट्विट मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे.

विकास ठाकूरला देणार ५० लाख
राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांच्या ९६ किलो वेटलिफ्टिंग गटात पंजाबच्या विकास ठाकूरने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. त्याला देखील पंजाब सरकार ५० लाख रूपयांचे बक्षीस देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी ट्विटद्वारे सांगितले. "लुधियानातील रहिवाशी असलेल्या विकास ठाकूरने भारतासाठी रौप्य पदक पटकावले आहे. आमचे सरकार पंजाब मधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे मदत करण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहे", अशा आशयाचे मुख्यंत्र्यांनी ट्विट केले. 

हरजिंदर कौरचा भाऊ प्रितपाल सिंगने म्हटले, "हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तिने खूप मेहनत घेतली होती त्यामुळेच कांस्य पदक मिळाले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास होता की ती नक्कीच पदक जिंकेल."  


 

Web Title: Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.