सिंग इज किंग! कांस्य पदकासह हॉकी संघातील खेळाडू पोहचले सुवर्ण मंदिरात (Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:38 AM2024-08-11T11:38:15+5:302024-08-11T11:38:32+5:30

हॉकीतील ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. इथं पाहा तो खास व्हिडिओ

Punjab Indian Hockey Team Members Offer Prayers At Sri Harmandir Sahib Golden Temple in Amritsar Watch Video | सिंग इज किंग! कांस्य पदकासह हॉकी संघातील खेळाडू पोहचले सुवर्ण मंदिरात (Video)

सिंग इज किंग! कांस्य पदकासह हॉकी संघातील खेळाडू पोहचले सुवर्ण मंदिरात (Video)

'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमधून मायदेशी परतलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो आहे. भारतात आल्यानंतर भारतीय हॉकी संघातील सदस्यांचे अगदी धमाक्यात स्वागत करण्यात आले. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संघातील खेळाडूंनी पंजाब येथील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात प्रार्थना केल्याचे दिसून येते.  

आधी जंगी स्वागत; आता कांस्य पदकासह  प्रार्थनेसाठी सुवर्ण मंदिरात पोहचले हॉकी चॅम्पियन 

जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं देशासाठी सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पुरुष हॉकी संघाने आपली छाप सोडली आहे. सलग टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. ऐतिहासिक कामगिरीनंतर संघातील खेळाडूंचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर संघातील खेळाडूंनी देशातील प्रसिद्ध सुवर्ण मंदीरात जाऊन प्रार्थना केल्याचे पाहायला मिळाले. 
भारतीय हॉकी संघानं ५२ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती करत रचला इतिहास

 ५२ वर्षांनी पहिल्यांदा भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं जिंकली आहेत.ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने हॉकीमध्ये एक विशेष कामगिरी नोंदवली आहे. सर्वाधिक 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई भारतीय संघाने या क्रीडा प्रकारात केली आहे. टोकिया आणि पॅरिस याआधी १९६८ आणि १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकीने सलग दोन पदकांची कमाई केली होती.    
 
लवकरच संपेल 'सुवर्ण दिना'ची देखील प्रतिक्षाही  

1980 मध्ये मास्को येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरीनंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये संघर्ष करताना दिसला. पण आता सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पियन चॅम्पियन होत, भारतीय हॉकी संघाने पुन्हा 'सुवर्ण दिन' येतील या आशा वाढवल्या आहेत.   
 

Web Title: Punjab Indian Hockey Team Members Offer Prayers At Sri Harmandir Sahib Golden Temple in Amritsar Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.