अटीतटीच्या लढतीत पंजाबचा मुंबईवर 7 धावांनी दिमाखदार विजय

By admin | Published: May 12, 2017 12:08 AM2017-05-12T00:08:54+5:302017-05-12T00:08:54+5:30

किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला अवघ्या 7 धावांची पराभव पत्करावा लागला आहे

Punjab scored a magnificent 7-run victory over Mumbai in the semifinal match | अटीतटीच्या लढतीत पंजाबचा मुंबईवर 7 धावांनी दिमाखदार विजय

अटीतटीच्या लढतीत पंजाबचा मुंबईवर 7 धावांनी दिमाखदार विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला अवघ्या 7 धावांची पराभव पत्करावा लागला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या या अटीतटीच्या लढतीत पंजाबनं मुंबईवर दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईला 19 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. किरेन पोलार्ड (50) आणि हरभजन सिंग (2) धावांसह मैदानावर शेवटपर्यंत टिकून होते. पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्सनं मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली. पटेल आणि सिमन्सनं पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.

मात्र 9व्या षटकांत शर्माच्या गोलंदाजीवर मनन वोहराकरवी पटेलला झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर 59 धावा करून सिमन्सही तंबूत परतला. सिमन्सनं 32 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत अर्धशतक साजरं करत 59 धावा केल्या. मात्र मॅक्सवेलनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुप्टिलकरवी सिमन्सला झेलबाद केले. त्यावेळी मुंबईची धावसंख्या 106 धावांच्या आसपास होती. मैदानावर आलेल्या कर्णधार रोहित शर्मालाही फारशी कमाल दाखवता आली नाही. रोहित 5 धावा काढून माघारी परतला. हार्दिक पंड्या(30) आणि करण शर्मा (19) धाव काढून तंबूत परतले. 
तत्पूर्वी मुंबईनं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबईसमोर विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबनं उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश करत 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकांत 230 धावांचा डोंगर उभा केला होता. एकट्या सहानं शानदार नाबाद खेळीच्या जोरावर 55 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकार लगावत अर्धशतक पार करत 93 धावांची खेळी केली. तर मॅक्सवेलनंही 21 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकार खेचत 47 धावा केल्या. मात्र बुमराहच्या गोलंदाजीसमोर मॅक्सवेलचा निभाव लागला नाही आणि तो तंबूत परतला. या सामन्यात गुप्टिल आणि सहानं सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली आहे. तर गुप्टिल 36, मार्श 25 आणि पटेल नाबाद 19 धावा केल्या आहेत.
 

Web Title: Punjab scored a magnificent 7-run victory over Mumbai in the semifinal match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.