पंजाबचं दिल्लीसमोर 182 धावांचं आव्हान
By admin | Published: May 7, 2016 09:38 PM2016-05-07T21:38:18+5:302016-05-07T21:38:18+5:30
किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मोहाली, दि. 07 - किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने बचावात्मक खेळ करत सेफ सुरुवात केली. स्टोनिस आणि साहाने प्रत्येकी 52 धावा केल्या. 182 धावा करताना पंजाबने 5 विकेट्स गमावल्या. दिल्लीने केलेल्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबच्या फलंदाजांना जीवनदानदेखील मिळाले. दिल्लीकडून झहीऱ खान आणि मोहम्मद शामीने प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मॉरीसने 2 विकेट्स घेतल्या.
दिल्ली संघ गुरुवारी आपल्याच मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटसविरुद्ध सात गड्यांनी पराभूत झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत हा संघ दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला. पंजाब संघ आठपैकी सहा सामन्यांत पराभूत झाल्याने अखेरच्या स्थानावर आहे. विजयासमीप येऊनही हा संघ वारंवार पराभूत होत आहे. चढउतार पाहणाऱ्या पंजाबने मागच्या सामन्यात कोलकाताविरुद्ध विजयाची पराकाष्ठा केली पण त्यांना सामना गमवावा लागला. त्याआधी गुजरात लॉयन्सवर या संघाने 23 धावांनी विजय नोंदविला होता. नवा कर्णधार मुरली विजय हा देखील संघाला विजय मिळवून देण्यात अपयशीच ठरला. सलग दोन सामने गमविल्याने संघाचे मनोबळ ढासळले आहे.
दुसरीकडे दिल्लीला पंजाबला नमवण्याची संधी असेल, तरी पंजाब मुसंडी मारू शकतो हे ध्यानात घेऊनच दिल्लीला सावध राहावे लागेल.