पूरव राजा, दिविज शरण जोडीने टेनिस स्पर्धा जिंकली
By admin | Published: June 21, 2016 08:30 PM2016-06-21T20:30:58+5:302016-06-21T20:30:58+5:30
स्टार टेनिस खेळाडू पूरव राजा आणि दिविज शरण जोडीने ब्रिटनमधील स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला आहे. एगॉन मँचेस्टर चॅलेंजर आणि एगॉन सुर्बिटोन चषक चॅलेंजर स्पर्धा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - स्टार टेनिस खेळाडू पूरव राजा आणि दिविज शरण जोडीने ब्रिटनमधील स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला आहे. एगॉन मँचेस्टर चॅलेंजर आणि एगॉन सुर्बिटोन चषक चॅलेंजर स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम या जोडीने केला आहे.
मँचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या या जोडीने दुसऱ्या मानांकित केन स्कुपस्की आणि नील स्कुपस्की या ब्रिटिश जोडीचा हिरवळीवर झालेल्या सामन्यात ६-३, ३-६ आणि ११-९ असा पराभव करत स्पर्धा जिंकली. त्यानंतर या जोडीने त्यानंतरच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेत विजयाची लय कायम राखताना ब्रिटनच्याच याच प्रथम मानांकित जोडीला नमवले. स्पर्धेत भारताच्या या जोडीने पुन्हा एकदा केन स्कुपस्की आणि नील स्कुपस्की यांना ६-४, ७-६ असे नमवत चषक पटकावला.
पूरव याने विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हिरवळीवर खेळ बहरत असल्याचे सांगितले. मी आणि दिविजने पहिल्यांदाच एकापाठोपाठ स्पर्धा जिंकल्याचा आनंद असल्याचेही त्याने नमूद केले.
आत्तापर्यंत आठ स्पर्धा जिंकणारा दिविज या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानावर पोहोचला आहे.