पर्पल कॅप विजेते

By admin | Published: April 8, 2015 05:53 PM2015-04-08T17:53:14+5:302015-04-08T18:13:29+5:30

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांना पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात येते. पर्पल कॅप पटकवणा-या गोलंदाजांमध्ये चेन्नई 'किंग' ठरली आहे.

Purple Cap winners | पर्पल कॅप विजेते

पर्पल कॅप विजेते

Next
>ऑनलाइन लोकमत
गोलंदाजांच्या कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणा-या टी - २० सामन्यांमध्ये फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाजांना अथक मेहनत घ्यावी लागते. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांना पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात येते. पर्पल कॅप पटकवणा-या गोलंदाजांमध्ये चेन्नई किंग ठरली आहे. या संघाचा गोलदाजांनी दोनदा पर्पल कॅप पटकावली आहे. 
आयपीएलमध्ये धावांचे डोंगर उभारले जात असताना धडाकेबाज खेळी करणा-या फलंदाजांना वेसण घालताना गोलंदाजांचा कस पणाला लागतो. आयपीएलमध्ये श्रीलंकेचा लासिथ मलिंगा हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणा-या मलिंगाने ८३ सामन्यात ११९ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर अमित मिश्राने ८६ सामन्यांमध्ये १०२ विकेट घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरचा क्रमांक लागतो. २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सोहेलने ४ षटकांत १४ धावा देऊन ६ विकेट घेतल्या. तर अनिक कुंबळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ३.१ षटकांत ५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या आहेत. 
वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा योगदान देणा-या जेम्स फॉल्कनरने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. पियूष चावला हा आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने ९८ सामन्यात तब्बल २,५४० धावा दिल्या आहेत. 
 
वर्षखेळाडूसंघसामनेएकूण षटकंदिलेल्या धावाविकेट्ससरासरी
२०१४मोहित शर्माचेन्नई सुपर किंग्ज१६५३.५४५२२३१९.६५
२०१३ड्वॅन ब्राव्होचेन्नई सुपर किंग्ज१८६२.३४९७३२१५.५३
२०१२मॉर्ने मॉर्केलदिल्ली डेअरडेव्हिल्स१६६३४५३२५१८.१२
२०११लासिथ मलिंगमुंबई इंडियन्स१६६३३७५२८१३.५
२०१०प्रग्यान ओझाडेक्कन चार्जर्स१६५८.५४२९२१२०
२००९रुद्रप्रताप सिंहडेक्कन चार्जर्स१६५९.४४१७२३१५.५६
२००८सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्स११४१.१२६६२२१२.०९

Web Title: Purple Cap winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.