महाराष्ट्राला धक्का

By admin | Published: January 13, 2016 03:53 AM2016-01-13T03:53:01+5:302016-01-13T03:53:01+5:30

आंध्र प्रदेशने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान महाराष्ट्रला द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या (बीडब्लूओ) वतीने आयोजित राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला.

Pushing to Maharashtra | महाराष्ट्राला धक्का

महाराष्ट्राला धक्का

Next

मुंबई : आंध्र प्रदेशने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान महाराष्ट्रला द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या (बीडब्लूओ) वतीने आयोजित राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानने मध्य प्रदेशवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
मरिन लाइन्स येथील इस्लाम जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ‘अ’ गटात नाणेफेक जिंकून आंध्र प्रदेशने यजमान संघाला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राच्या नीलेश-अनिशने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घेताना तीन षटकात ४० धावांची वेगवान भागीदारी केली. यष्टिरक्षकाच्या मागील चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना नीलेश धावचीत झाला. त्यानंतर कर्णधार प्रशांतने धावफलक हलता ठेवला. प्रशांत ऐन रंगात असताना दुसऱ्या बाजूने गडी बाद होत राहिले. सामन्यात तब्बल ७ गडी धावचीत झाले. प्रशांतच्या २३ चेंडूतील ३० धावांच्या जोरावर महाराष्ट्रने १२ षटकांत ८ बाद १३० धावांची आव्हानात्मक मजल मारली.
प्रत्युत्तरात आंध्रच्या सलामीवीरांनीही तोडीस तोड फलंदाजी केली. आर. रवी याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. महाराष्ट्राच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा फायदा आंध्रच्या फलंदाजांनी घेतला. प्रशांतने ३ षटाकांत दोन गडी मिळवले. दरम्यान, अखेरीस अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता असताना तीन चेंडूतच आंध्रने विजय निश्चित केला. महाराष्ट्राने सामन्यात तब्बल २६ धावा अतिरिक्त दिल्या.
दुसऱ्या बाजूला राजस्थानने मध्य प्रदेशचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मध्य प्रदेशच्या अंगलट आला. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत प्रल्हाद त्रिफळाचीत झाला. सुरेशच्या २८ धावांच्या मदतीने मध्य प्रदेशने निर्धारित षटकात १०२ धावांचे माफक लक्ष्य राजस्थान समोर ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने एका फलंदाजाच्या मोबदल्यात ७.५ षटकात ते पार केले. बिक्रमने २३ चेंडूत नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी केली. प्रशांतने ३० धावा करीत त्याला योग्य साथ दिली.

Web Title: Pushing to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.