Asian Games 2018: सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:32 AM2018-08-24T09:32:24+5:302018-08-24T09:45:10+5:30

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय सहाव्या दिवशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.

Quadruple sculls rowing: Indian men's team wins gold medal | Asian Games 2018: सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक

Asian Games 2018: सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक

Next

 पालेमबांग - आशियाई स्पर्धेत भारतीय सहाव्या दिवशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.  दत्तू भोकानल, ओम प्रकाश, स्वर्ण सिंह, सुखमीत सिंह यांनी नौकानयन सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यावेळी भारतीय संघाने 6:17:13 अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. याआधी भारताला नौकायनमध्ये 2 कांस्य पदकं मिळाले आहे आणि आता या कामगिरीमुळे एका सुवर्णपदकाची यामध्ये भर पडली आहे.  या स्पर्धेतील भारताला मिळणारे हे पाचवे सुवर्णपदक आहे. 


आज सकाळी झालेल्या सामन्यात दुष्यंत चौधरीने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने 7:18:76 अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूला सुवर्ण तर हाँग काँगच्या खेळाडूला रौप्यपदक मिळाले. यापाठोपाठ भारताच्या रोहित कुमार – भगवान सिंह जोडीलाही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळाले. 



 



दरम्यान, भारताला नौकायनमध्ये कांस्य पदक मिळवून देणाऱ्या रोहित कुमार आणि भगवान सिंग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. 



 

Web Title: Quadruple sculls rowing: Indian men's team wins gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.