क्वालिफायर लुसीकडून इव्हानोविचला पराभवाचा धक्का

By admin | Published: January 20, 2015 12:26 AM2015-01-20T00:26:54+5:302015-01-20T00:26:54+5:30

माजी नंबर वन खेळाडू आणि स्पर्धेत पाचवे मानांकनप्राप्त सर्बियाची अ‍ॅना इव्हानोविच हिच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली़

Qualifier Lucie defeats Evanovich | क्वालिफायर लुसीकडून इव्हानोविचला पराभवाचा धक्का

क्वालिफायर लुसीकडून इव्हानोविचला पराभवाचा धक्का

Next

मेलबोर्न : माजी नंबर वन खेळाडू आणि स्पर्धेत पाचवे मानांकनप्राप्त सर्बियाची अ‍ॅना इव्हानोविच हिच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली़ पुरुष गटात स्पेनचा राफेल नदाल, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, तर महिला गटात रशियाची मारिया शारापोव्हा यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून शानदार सलामी दिली़
स्पर्धेत द्वितीय मानांकनप्राप्त आणि ५ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन मारिया शारापोव्हा हिने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचवर ६-४, ६-१ ने सहज विजय मिळविला़ शारापोव्हा स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यास पुन्हा क्रमवारीत नंबर वनवर विराजमान होईल़
रुमानियाच्या सिमोना हालेपने इटलीच्या करीन केनापला ६-३, ६-२ अशा फरकाने पराभूत करून आगेकूच केली, तर जर्मनीच्या नववे मानांकनप्राप्त एंजेलिक कर्बरला रुमानियाच्या इरिना कॅमिलिया बेगू हिच्याकडून तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, ०-६, ६-१ ने पराभव स्वीकारावा लागला़
पुरुष गटातील एकेरी सामन्यात फेडररने लौकिकास साजेसा खेळ करताना चिनी-तैपेईच्या येन सून लू याच्यावर ६-४, ६-२, ७-५ने सहज विजय मिळविला़ फेडररने पहिले दोन्ही सेट सहज आपल्या नावे करण्यात यश मिळविले; मात्र त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये सून याने आपल्या खेळाचा स्तर उंचावला;मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता़ या सेटमध्येही फेडररने बाजी मारताना स्पर्धेत आगेकूच केली़ आता फेडररला पुढच्या फेरीत इटलीच्या सिमोन बोलेलीशी झुंजावे लागेल.
टॉमस बेर्डिच याने विजयी सुरुवात करताना कोलंबियाच्या एलेजांद्रो फाला याला सरळ सेटमध्ये ६-३, ७-६, ६-२ अशी धूळ चारली़ दहावे मानांकन प्राप्त उदयोन्मुख खेळाडू बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याने पहिल्या फेरीची बाधा सहज पार केली़ त्याने जर्मनीच्या डस्टिन ब्राटनवर ६-२, ६-३ अशी मात केली़
पुरुष गटातील अन्य सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका केविन अँडरसन, बेल्जियमचा डेव्हिड गोफिन, अर्जेंटिनाचा लियांड्रो मेयर, फिलिप कोलश्रोबर (जर्मनी), रिचर्ड गास्केट (फ्रान्स), लुकास रोसोल (झेक प्रजासत्ताक), जेरेमी चार्डी (फ्रान्स), स्लोवाकियाचा मार्टिन क्लिजाजॅन यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करून सहज दुसरी फेरी गाठली़
महिला गटातील अन्य सामन्यांत लुसी सैफरोव्हा (झेक प्रजासत्ताक), कार्ला सुआरेज (स्पेन), एनस्तेसिया पावलेचेनकोव्हा (रशिया), स्वेतलाना कुज्नेत्सोव्हा (रशिया), सबाईन लिसिकी (जर्मनी), बेलिंडा बेनसिच (स्वित्झर्लंड) यांना आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत बाहेर व्हावे लागले़ (वृत्तसंस्था)

च्राफेल नदाल याने आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर रशियाच्या मिखाईल युझनीवर
६-३, ६-२, ६-२ अशा फरकाने सरशी साधली़
च्विशेष म्हणजे, नदालने गत वर्षी झालेल्या विम्बल्डननंतर केवळ ७ सामने खेळले आहेत़ पाठ आणि मनगटाच्या दुखापतीमुळे तो बरेच दिवस कोर्टपासून बाहेर होता़
च्त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात होता; मात्र नदालने पहिली फेरी सहज पार केली़
च्आता पुढच्या फेरीत त्याचा सामना अमेरिकेचा क्वालिफायर टीम स्माईसजेकशी होणार
आहे़

च्महिला एकेरी लढतीत इव्हानोविचला जागतिक मानांकनात १४२व्या क्रमांकावर असलेल्या झेक प्रजासत्ताकाच्या लुसी हार्डेका हिच्याकडून १-६, ६-३, ६-२ अशा फरकाने पराभवाची नामुष्की ओढवली़

Web Title: Qualifier Lucie defeats Evanovich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.