पोलंड उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 26, 2016 01:59 AM2016-06-26T01:59:38+5:302016-06-26T01:59:38+5:30
जेकब ब्लाजसिवोस्कीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने पेनाल्टी शूटआऊ टवर स्वित्झर्लंडला ५-४ असे हरवून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
सेंट एटिनी : जेकब ब्लाजसिवोस्कीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने पेनाल्टी शूटआऊ टवर स्वित्झर्लंडला ५-४ असे हरवून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पेनाल्टीमध्ये दुसरा शॉट मारण्यास आलेल्या ग्रेनिटी शाकाचा फटका भरकटून गोलपोस्टच्या बाहेर गेला, त्यामुळे तो गोल नोंदवण्यास अपयशी ठरला. त्याचे हे अपयश संघाला पराभवाच्या गर्तेत घेवून गेले.
ब्लाजसिवोस्कीने पोलंडला पुर्वार्धात आघाडी मिळवून दिली. परंतु शेरडन शाकिरीने उत्तरार्धात गोल नोंदवून निर्धारीत वेळेत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही ही बरोबरी न सुटल्याने सामना अर्थात पेनल्टी शूटआऊ टवर गेला. यात पोलंडने ५-४ अशी बाजी मारली.
पोलंडकडून पाचही शॉटवर गोल झाले. स्वित्झर्लंडकडून पहिला गोल लिंचेस्टेनियरने केला. दुसऱ्या फटक्याच्यावेळी मात्र स्वित्झर्लंडला नशीबाने दगा दिला. गोलकिपरने चेंडूच्या विरुध्द दिशेला झेप घेवून मार्ग मोकळा केला होता, परंतु चेंडू गोलपोस्टच्या खांबाला धडकून बाहेर गेला. ही एकमेव चूक स्वित्झर्लंडला महागात पडली आणि त्यांचा पराभव झाला. (वृत्तसंस्था)