निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले

By Admin | Published: April 1, 2016 08:39 AM2016-04-01T08:39:40+5:302016-04-01T08:49:24+5:30

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी रात्री निवृत्तीच्या प्रश्नावर वेगळयाच कृतीतून उत्तर देऊन सर्वांनाच अवाक केले.

On the question of retirement, Captain Coolan responded by putting a neighbor to the journalist | निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले

निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी रात्री निवृत्तीच्या प्रश्नावर वेगळयाच कृतीतून उत्तर देऊन सर्वांनाच अवाक केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॉमचा पत्रकार सॅम्युल फेरीसने धोनीला वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर तू यापुढेही खेळत रहाणार का ? असा प्रश्न विचारला. 
 
त्यावर धोनीने सॅम्युलला पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. सॅम्युलने पुन्हा तोच प्रश्न विचारताच धोनीने त्याला आपल्या शेजारी बसण्यासाठी बोलावले. 'इथे ये' आपण थोडी गंमत करु. धोनी असा रिअॅक्ट झाल्याने सॅम्युल काहीसा गोंधळला. 
 
धोनीने त्याच्या शेजारची खुर्ची थोडी सरकवली व तिथे सॅम्युलला बसण्यासाठी बोलावले. सॅम्युल आपल्या आसनावरुन धोनीच्या शेजारी जाऊन बसताच आता काय होणार ? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. ते दृश्य कॅमे-यात टिपण्यासाठी क्लिकचा लखलखाट सुरु होता. सॅम्युल शेजारी बसल्यानंतर धोनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला विचारले 
 
तुला वाटते का मी निवृत्त व्हावे ? त्यावर सॅम्युलने नाही मला असे वाटत नाही. मला तुमच्याकडून याच प्रश्नावर उत्तर हवे असे सांगितले. 
 
तुला मी अनफीट वाटतो का ?, माझ्या धावण्याकडे बघ. 
नाही तुम्ही खूप फास्ट आहात असे सॅम्युलने सांगितले. 
 
२०१९ वर्ल्डकपपर्यंत मी खेळत राहीन असे तुला वाटते का ? 
हो, नक्की असे सॅम्युलने उत्तर दिले. त्यावर धोनीने तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असावे असे सांगितले. त्यानंतर सॅम्युल आपल्या जागेवर जाऊन बसला. 
 

Web Title: On the question of retirement, Captain Coolan responded by putting a neighbor to the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.