आर. अश्विन दुखापग्रस्त; सरावादरम्यान हाताला चेंडू लागला
By admin | Published: July 4, 2016 08:16 PM2016-07-04T20:16:06+5:302016-07-04T20:16:06+5:30
टीम इंडियाचा हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या सराव शिबीराच्या अखेरच्या दिवशी तो सहभागी झाला नाही
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ४ : टीम इंडियाचा हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या सराव शिबीराच्या अखेरच्या दिवशी तो सहभागी झाला नाही. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी रात्री टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे.
संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये संघाचा खडतर सराव सुरु आहे. माहितीनुसार, सकाळच्या सत्रामध्ये अश्विनच्या हाताला चेंडू लागला. यावेळी होत असलेल्या वेदनामुळे अश्विनने यानंतर उरलेल्या सराव सत्रात सहभाग घेतला नाही. प्रशिक्षक कुंबळे म्हणाले, ह्यह्यअश्विनची दुखापत गंभीर नसून आम्ही त्याच्या दुखापतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.ह्णह्ण दखल घेण्याची बाब म्हणजे, नुकताच वेस्ट इंडिज येथे झालेल्या त्रिकोणीय मालिकेत फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली असल्याने, विंडिज दौऱ्यात अश्विनची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरु शकते.