आर. आश्विन ‘नंबर वन’ अष्टपैलू

By admin | Published: December 8, 2015 11:55 PM2015-12-08T23:55:38+5:302015-12-08T23:55:38+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत

R. Ashwin 'number one' all-rounder | आर. आश्विन ‘नंबर वन’ अष्टपैलू

आर. आश्विन ‘नंबर वन’ अष्टपैलू

Next

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत १४ स्थानांची प्रगती करताना भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला फिरकीपटू रविचंद्रन आश्विन जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावणारा आणि चौथ्या कसोटी सामन्यात दोन डावांत अनुक्रमे १२७ व नाबाद १०० धावांची खेळी करणाऱ्या रहाणेने १४ स्थानांची झेप घेत कसोटी फलंदाजांमध्ये १२ वे स्थान पटकावले. रहाणेची कारकिर्दीतील हे सर्वोत्तम मानांकन आहे. या मालिकेपूर्वी रहाणे २६ व्या स्थानी होता. रहाणेव्यतिरिक्त आयसीसी मानांकनामध्ये आश्विनने नवे शिखर गाठले आहे. बांगलादेशच्या शाकिब अल-हसनला पिछाडीवर सोडताना आश्विन जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. आश्विनने फ्रिडम सिरीजमध्ये गोलंदाजी व फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. आश्विनने मालिकेत सर्वाधिक ३१ बळी घेत मालिकावीर पुरस्काराचा मान मिळवला. (वृत्तसंस्था)
हा विजय आमच्यासाठी नवी सुरुवात : आश्विन
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत ३-० ने शानदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन याने हा विजय टीम इंडियासाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. मालिकेत ११.१२च्या सरासरीने ३१ बळी घेऊन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला आश्विन म्हणाला.

Web Title: R. Ashwin 'number one' all-rounder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.