‘आर. पी.’ची भूमिका महत्त्वाची

By admin | Published: January 17, 2017 07:47 AM2017-01-17T07:47:21+5:302017-01-17T07:47:21+5:30

आर. पी. सिंगची गेल्या दोन सत्रांतील ड्रेसिंग रूममधील उपस्थिती संघाला रणजी स्पर्धेत पहिले जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली

'R. P.'s role is important | ‘आर. पी.’ची भूमिका महत्त्वाची

‘आर. पी.’ची भूमिका महत्त्वाची

Next


नवी दिल्ली : मूळचा उत्तर प्रदेशचा, परंतु सध्या गुजरातकडून खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगची गेल्या दोन सत्रांतील ड्रेसिंग रूममधील उपस्थिती संघाला रणजी स्पर्धेत पहिले जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली, अशी प्रतिक्रिया टीम इंडिया व गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेल याने व्यक्त केली.
अक्षर म्हणाला, ‘प्रशिक्षक विजय पटेल आणि कर्णधार पार्थिव पटेल यांच्याव्यतिरिक्त आर. पी. सिंगच्या उपस्थितीमुळे सांघिक कामगिरी करता आली. आर. पी.मुळे ड्रेसिंग रूममध्ये व्यावसायिकपणा आला. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तो सदैव सज्ज असायचा. तो दुसऱ्या राज्यातील क्रिकेटपटू आहे, असे आम्हाला कधीच जाणवले नाही.’
भारत आणि इंग्लंड यांच्या पाचव्या कसोटीदरम्यान अक्षरच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेत केवळ चार सामने खेळता आले. दरम्यान, तो पूर्णवेळ रणजी संघासोबत होता. गुजरातने अंतिम लढतीत मुंबई संघाचा पराभव करीत रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावले.
अक्षर पुढे म्हणाला, ‘आम्ही १९ वर्षांखालील गटापासून कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे जेतेपद पटकावता आले. जास्तीत जास्त खेळाडू ज्युनिअर क्रिकेट एकत्र खेळले आहेत. सीनिअर पातळीवर एकत्र खेळताना त्याची मदत होते.’
>आर. पी. केवळ पाच सामने खेळला, पण संघाला गरज असताना त्याने महत्त्वाचे बळी मिळवून दिले. त्याचा सर्वाधिक प्रभाव मैदानाबाहेर दिसला. तो फलंदाजांची मानसिकता ओळखणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडून आम्हाला हे शिकायला मिळाले. तो मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असतो आणि सरावादरम्यान खेळाडूंना मदत करतो. - अक्षर पटेल

Web Title: 'R. P.'s role is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.