राजभवनात छत्रपती पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:26 AM2017-07-31T02:26:45+5:302017-07-31T02:27:04+5:30
देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारांचे वितरण जर नवी दिल्ली येथे राजभवनात होत असेल, तर आपल्या राज्याच्या खेळाडूंना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे राजभवनात का करू नये
पुणे : देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारांचे वितरण जर नवी दिल्ली येथे राजभवनात होत असेल, तर आपल्या राज्याच्या खेळाडूंना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे राजभवनात का करू नये, प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात जाऊन कार्यक्रम करायचे ते योग्य नाही. त्यामुळे येथून पुढे या पुरस्काराचे वितरण राजभवनात होईल. तेसुद्धा १८ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. असे राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनची (एमओए)
वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी राज्यातील आॅलिम्पिक संघटनेशी संलग्न असलेले विविध राज्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
समाधानकारक कामगिरी असणाºया खेळाडूंनाच निधी-
४राज्यातील विविध राज्य क्रीडा संघटनांच्या वतीने आयोजित होणाºया राज्यस्तरीय स्पर्धा आणि त्यांचे राष्टÑीय स्पर्धांसाठी जाणाºया संघांचे प्रशिक्षण शिबिरासाठी राज्य शासनाची क्रीडा संकुले यापुढे विनामूल्य देण्याचा प्रस्ताव आहे. या सर्व निर्णयांचे अध्यादेश काढण्यात येतील, आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.
मिशन आॅलिम्पिकअंतर्गत निवडण्यात आलेल्या ६१ खेळाडूंना निधी वाटपाबाबत तावडे म्हणाले, या खेळाडूंची सध्याची कामगिरी पाहूनच त्यांची नावे अंतिम केली जातील. जर त्यांची कामगिरी समाधानकारक नसेल तर या योजनेतून त्यांचे नाव वगळण्यात येईल आणि त्यांच्या जागी योग्य खेळाडूची निवड केली जाईल. समाधानकारक कामगिरी नसणाºया खेळाडूंना पैसे देण्यात अर्थ नाही. राज्य संघटनांनी नावे दिल्यानंतरच ही नावे अंतिम केली जातील. केरळ राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांच्या निधीबाबत ते म्हणाले, की अध्यादेशाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पारितोषिकाची रक्कम दिली जाईल.
विभागीय क्रीडा स्पर्धांची अट रद्द-
विविध क्रीडा संघटनांनी विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात ही जी अट होती ती क्रीडामंत्र्यांनी रद्द केली असल्याची माहिती महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली. मिनी आॅलिम्पिक स्पर्धेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘क्रीडामंत्र्यांनी या स्पर्धेसाठी राज्यातील क्रीडा संकुले उपलब्ध करून देण्याचे कबूल केले आहे.’ संघटनांच्या वादांबाबत विचारले असता ते लांडगे म्हणाले, ‘भारतीय आॅलिम्पिक संघटनेची मान्यता ज्या राज्यसंघटनेला असेल, त्यांनाच एमओएची मान्यता देण्यात येईल.’