राफाची अंतिम फेरीत धडक..

By admin | Published: January 27, 2017 08:06 PM2017-01-27T20:06:52+5:302017-01-27T21:17:11+5:30

स्पेनचा १४ ग्रँडस्लॅम विजेता बलाढ्य राफेल नदाल याने तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Rafa beats in final | राफाची अंतिम फेरीत धडक..

राफाची अंतिम फेरीत धडक..

Next

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 27 : स्पेनचा १४ ग्रँडस्लॅम विजेता बलाढ्य राफेल नदाल याने तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत बल्गेरीयाच्या ग्रिगोर दिमित्रोवचे कडवे आव्हान ६-३, ५-७, ७-६(५), ६-७(४), ६-४ असे परतावले. विशेष यासह टेनिसप्रेमींना पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमची रॉजर फेडरर वि. राफेल नदाल अशी ड्रीम फायनल अनुभवण्याची संधी मिळाली आहे.

अत्यंत थरारक झालेल्या या अंतिम सामन्यात नदालने पहिला सेट जिंकून आश्वासक सुरुवात केली. परंतु, झुंजार दिमित्रोवने सहजासहजी हार न पत्करताना नदालला चांगलेच दमवले. पाच सेटपर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात नदालने अंतिम सेटमध्ये मोक्याच्यावेळी दिमित्रोवची सर्विस ब्रेककरुन निर्णायक आघाडी घेतली. यानंतर दबावाखाली आलेल्या दिमित्रोवच्या माफक चुकांचा फायदा घेत त्याने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

आता, टेनिसप्रेमींची प्रतीक्षा लागली आहे ती रविवारी होणाऱ्या हायव्होल्टेज अंतिम सामन्याची. २०१४-२०१५ नंतर पहिल्यांदाच फेडरर - नदाल आमनेसामने येतील. त्यावेळी फेडररने स्विस ओपनच्या अंतिम सामन्यात नदालला नमवून जेतेपद पटकावले होते. याआधी २०१४ साली आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात फेडरर - नदालची लढत झाली होती. त्यात नदालने सरल तीन सेटमध्ये बाजी मारुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

लक्षवेधी :
- २०११ च्या फ्रेंच ओपन फायनलनंतर पहिल्यांदाच फेडरर वि. नदाल अशी ग्रँडस्लॅम फायनल होईल.
- २००९ साली आॅस्टे्रलियन ओपनमध्ये फेडररला नमवून नदालने जेतेपद पटकावले होते.
- आतापर्यंत ३ वेळा या स्पर्धेत फेडडर - नदाल आमनेसामने आले असून तिन्ही वेळा नदालने बाजी मारली आहे.
- २०१२ व २०१४ साली उपांत्य सामन्यात नदालने उपांत्य सामन्यात फेडररला पराभूत केले.
- नदाल व फेडरर यांच्यातील एकूण सामन्यांचा रेकॉर्ड २३-११ असा आहे. 
- ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यातही याआधी नदालने फेडररविरुध्द ६-२ असे ववर्चस्व राखले आहे. 
- नजीकच्या काळात नोव्हेंबर २०१५ मध्ये फेडररने स्विस ओपन अंतिम सामन्यात नदालला पराभूत केले.
- नदालने २०१४ साली फ्रेंच ओपनच्या रुपाने आपले अखेरचे ग्रँडस्लॅम जिंकले होते.
- ह्यओपन युगह्णमध्ये चारही ग्रँडस्लॅम किमान दोन वेळा जिंकण्यारा पहिला खेळाडू बनण्याची नदालला संधी.
- पुरुष व महिला गटाची अंतिम फेरी गाठणारे सर्व खेळाडू ३० किंवा त्याहून अधिक वयाचे. 
........................................

रॉजर फेडररसह पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी खेळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच, ग्रँडस्लॅमची अंंतिम फेरी गाठणे आम्हा दोघांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. गतवर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. पुन्हा एकदा उच्च स्तरावर येण्यासाठी खूप मेहनत घेतली. रॉलँड गॅरोस (फ्रेंच ओपन) माझ्यासाठी खूप कठीण ठरले. आॅस्टे्रलियन ओपनची अंतिम फेरी गाठण्याचे मी स्वप्न पाहिले नव्हते... पण मी आता अंतिम फेरीत आहे. मी स्वत:ला खूप नशिबवान समजत असून सध्या मी खूप खूश आहे. 
- राफेल नदाल

Web Title: Rafa beats in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.