Rafael Nadal, French Open 2022: Alexander Zverev सिंहासारखा लढला पण खेळताना पाय सरकला अन्... नदाल फायनलमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 10:40 AM2022-06-04T10:40:15+5:302022-06-04T10:41:12+5:30
नदालला २२वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी
Rafael Nadal, French Open 2022: स्पेनचा स्टार टेनिसपटूराफेल नदाल पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याने फ्रेंच ओपन २०२२ मध्ये पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी नदालचा उपांत्य सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. हा सामना अतिशय रोमांचक होता. पण दुर्दैवाने, सामन्याच्या मध्येच झ्वेरेवचा पाय सरकला, तो जमिनीवर पडला आणि जखमी झाला. यानंतर त्याना व्हिलचेअरवर बसवून बाहेर नेण्यात आले. या घटनेनंतर त्याला खेळणं शक्य नव्हतं. झ्वेरेव्ह कोर्टवर परतू शकला नाही आणि त्यामुळे नदालला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.
Sunday is set 🏆#RolandGarrospic.twitter.com/tDDpsvP01O
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
नक्की काय घडलं?
सामन्यातील पहिला सेट नदालने टायब्रेकरमध्ये 7-6 असा जिंकला. नदाल आणि झ्वेरेव्ह यांच्यात ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर दुसरा सेटही टायब्रेकरमध्ये गेला. त्याचदरम्यान, झ्वेरेव चेंडू घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. काही वेळाने झ्वेरेव्हने पुनरागमन केले, मात्र तो कुबड्यांच्या मदतीने आला. झ्वेरेव्हची ती अवस्था पाहून त्याच्या झुंजारवृत्तीला चाहत्यांना अभिवादन केले. चाहत्यांनी उभे राहून झ्वेरेवचे कौतुकही केले आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
⚔️ A thrilling battle came to a tough end with an injury to @AlexZverev but he and @RafaelNadal played some amazing points!
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
Check out the Highlights by @emirates 🎥#RolandGarros | #EmiratesFlyBetterMomentpic.twitter.com/E9vn2iRF1v
नदालच्या नावावर २१ ग्रँडस्लॅम विजेतेपदं
फ्रेंच ओपन- १३
अमेरिकन ओपन- ४
ऑस्ट्रेलियन ओपन- २
विम्बल्डन- २
Maiden Slam final mood 😃@CasperRuud98 becomes the first Norwegian man in history to reach a Grand Slam #RolandGarrospic.twitter.com/ShQEPIOwFh
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
नदाल-रुड फायनल ५ जूनला होणार
फ्रेंच ओपनमधील पुरुष एकेरीचा अंतिम सामना ५ जून रोजी होणार आहे. यामध्ये नदालची स्पर्धा नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होणार आहे. रुडने शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलिकला ३-६, ६-४, ६-२, ६-२ असे पराभूत केले.