राफेल नदाल-मार्क लोपेझचा अनोखा सराव
By admin | Published: September 15, 2016 12:57 AM2016-09-15T00:57:58+5:302016-09-15T00:57:58+5:30
डेव्हिस चषकासाठी भारतात आलेल्या स्पेनच्या राफेल नदाल आणि मार्क लोपेझ या जोडीने डीएलटीए परिसरात चाहत्यांची मने जिंकली.
नवी दिल्ली : डेव्हिस चषकासाठी भारतात आलेल्या स्पेनच्या राफेल नदाल आणि मार्क लोपेझ या जोडीने डीएलटीए परिसरात चाहत्यांची मने जिंकली. या दोघांनी आपल्या अनोख्या सरावाने लक्ष वेधले. कडक उन्हात या जोडीने सर्व्हिसद्वारे चेंडूला रिकाम्या डब्यास लक्ष्य बनविले. सकाळच्या सत्रात ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी मैदानी स्ट्रोक आणि सर्व्हिसचा अभ्यास केला. मात्र, त्यांचा सराव असामान्य होता. नदाल आपला नियमित सराव करीत होता. त्यानंतर मात्र कर्णधार कोंचित मार्टिनेझने नदाल आणि लोपेझ यांना कोर्टच्या एका बाजूला नेले आणि आपल्या सर्व्हिसद्वारे चेंडूला रिकाम्या डब्यात मारण्यास सांगितले. रिओ आॅलिम्पिकच्या सुवर्णपदक प्राप्त या दुहेरी जोडीने सर्व्हिसचा सराव केला.
माझ्याकडे ग्रॅण्डस्लॅम नाही; कारण मी दावेदार नाही :डेव्हिड फेरर
डेव्हिड फेरर आपल्या खेळाप्रती प्रामाणिक आहे. १६ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने एकेरीत ६८५ विजय नोंदवले आहेत. सर्वाधिक विजयांच्या विक्रमात तो १३ व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी तो ग्रॅण्डस्लॅम किताब जिंकू शकलेला नाही.
ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची आशा आहे काय? यावर मात्र फेररने प्रामाणिक उत्तर दिले. तो म्हणाला, की माझ्याकडे किताब नाही; कारण त्याचा मी दावेदार नाही. फेरर हा एटीपी टूरवर ग्रॅण्डस्लॅम न जिंकणारा; पण सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू आहे.