रहाणे - वॉटसनमुळे राजस्थान अजिंक्य, चेन्नईवर केली मात

By admin | Published: April 19, 2015 05:44 PM2015-04-19T17:44:58+5:302015-04-19T19:24:47+5:30

शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणेच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर मात करत आयपीएलमध्ये सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे.

Rahane - Watson overtakes Rajasthan Royals in Chennai, Chennai | रहाणे - वॉटसनमुळे राजस्थान अजिंक्य, चेन्नईवर केली मात

रहाणे - वॉटसनमुळे राजस्थान अजिंक्य, चेन्नईवर केली मात

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 19 -  कर्णधार शेन वॉटसन व अजिंक्य रहाणचे 'रॉयल' खेळीने राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नईचे 157 धावांचे लक्ष्य राजस्थानने 18.2 षटकांत फक्त दोन विकेट गमावत सहजपणे गाठले. 

आयपीएलमध्ये रविवारी  राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्ज हे तुल्यबळ संघ आमने सामने होते. चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रॉयल्सच्या गोलंदाजांना चेन्नईचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर ब्रँडन मॅक्यूलम 12 धावांवर माघारी परतला.तर सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस आणि ड्वॅन स्मिथ 40 धावांवर बाद झाला. चेन्नईची अवस्था 4 बाद 65 अशी झाली होती. मात्र त्यानंतर ड्वॅन ब्राव्हो आणि महेंद्रसिंग धोनीने 91 धावांची भागीदारी केल्याने चेन्नईला 156 धावांचा पल्ला गाठता आला. राजस्थानतर्फे जेम्स फॉल्कनर, ख्रिस मॉरिस, प्रवीण तांबे आणि अंकित शर्मा या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

चेन्नईचे 156 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात दमदार झाली. दुखापतीतून सावरलेला शेन वॉटसन व अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला उतरली. या जोडीने संघाला शतकी सलामी करुन संघाच्या विजयाचा पाया रचून दिला. या जोडीने संघाला 144 धावांची सलामी करुन दिली. वॉटसन 47 चेंडूत 73 धावा करुन बाद झाला. तर स्टिव स्मिथही सहा धावा करुन माघारी परतला. अजिंक्य रहाणेने 55 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अजिंक्य रहाणे यंदाच्या पर्वात 5 सामन्यात 231 धावा केल्या असून सध्या ऑरेंज कॅप रहाणेकडे आहे. 

Web Title: Rahane - Watson overtakes Rajasthan Royals in Chennai, Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.