राही, अंजली, मधुरा यांना सुवर्ण
By admin | Published: February 6, 2015 02:04 AM2015-02-06T02:04:51+5:302015-02-06T02:04:51+5:30
अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, वेदांगी तुलजापूरक यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांका जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची लयलूट केली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वीरधवल, ज्योत्स्ना, आकांक्षा, मोनिका, दिशा, निष्ठा, सौरभ यांची पदकांची लयलूट
तिरुअनंतपुरम : मधुरा तांबे, आकांक्षा व्होरा, वीरधवल खाडे, राही सरनोबतल श्रेया गावडे, श्रद्धा नलमवार, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, वेदांगी तुलजापूरक यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांका जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची लयलूट केली.
महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राच्या मधुरा तांबेने रिबन प्रकारात उत्कृष्ट कला सादर करुन सुवर्णपदक जिंकले. हूप्स् प्रकारात दिशा निद्रे व व निष्टा शाह यांना कास्यपदकावर समाधान मानावे लागले. क्लब्ज प्रकारात दिशा निद्रेने रौप्यपदक जिंकले.
महाराष्ट्र संघाच्या नेमबाजांनी
३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकले.
4 महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पी. प्रकारात अंजली भागवत, तेजस्विनी सावंत व वेदांगी तुलजापूरक यांनी सुवर्णपदक जिंकले.
५० मीटर र्थी पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या वेदांगी तुजापूरकरने रौप्यपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला.
वेटलिफ्टिंग प्रकारात महाराष्ट्राच्या कोमल वाळकेने +७५ किलो गटात एकूण १९५ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
कोमलने स्नॅचमध्ये ९० आणि क्लीन अॅन्ड जर्कमध्ये १०५ किलो वजन उचलले.
सांघिक गटात राही, श्रेया व श्रद्दा यांनी सुवर्ण वेध घेतला.
महाराष्ट्राची स्टार खेळाडू राही सरनोबतने व्यक्तीक २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण तर श्रेया गावडेने कास्यपदक जिंकले.