राहीला सुवर्ण तर अनिसाला कांस्य
By admin | Published: February 13, 2016 11:28 PM2016-02-13T23:28:22+5:302016-02-13T23:28:22+5:30
नेमबाजीमध्ये ओंकार सिंग, राही सरनौबत आणि अंजुम मद््गल यांनी सुवर्णपदकाचा मान मिळवला. भारताने तीन सांघिक स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानच्या कली
गुवाहाटी : नेमबाजीमध्ये ओंकार सिंग, राही सरनौबत आणि अंजुम मद््गल यांनी सुवर्णपदकाचा मान मिळवला. भारताने तीन सांघिक स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानच्या कलीमुल्लाहने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. भारतीय पथकाने १८ सुवर्ण, ८ रौप्य आणि ८ कांस्यपदकांची कमाई केली. गुरप्रीत सिंगची पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलममध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जितेंद्र विभूतीने कांस्यपदक पटकावले. ओंकार, गुरप्रीत व जितेंद्र यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सरनौबतने सुवर्णपदक पटकावले. अन्नू राजसिंग दुसऱ्या तर अनिसा सय्यद तिसऱ्या स्थानी राहिली.