राहुल

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:54+5:302015-08-20T22:09:54+5:30

मला आणखी धावा काढायला पाहिजे होत्या : राहुल

Rahul | राहुल

राहुल

Next
ा आणखी धावा काढायला पाहिजे होत्या : राहुल
कोलंबो : लोकेश राहुलने शतकी खेळी करीत श्रीलंकेविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरला, पण संघाला अधिक मजबूत स्थिती गाठून देण्यासाठी आणखी धावा करायला पाहिजे होत्या, अशी प्रतिक्रिया या सलामीवीराने व्यक्त केली. २३ वर्षीय राहुलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावल्यामुळे समाधान व्यक्त केले, पण १०८पेक्षा अधिक धावा फटकावता न आल्यामुळे निराशा जाहीर केली.
'मला पहिल्या कसोटी सामन्यात धावा फटकावता आल्या नव्हत्या. आज नैसर्गिक खेळ करता आल्यामुळे समाधान झाले. मला यापेक्षा सरस कामगिरी करण्याची संधी होती, पण त्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झालो. दिवसाच्या तिसर्‍या सत्रात अधिक धावा फटकावण्याची संधी आहे. त्या वेळी खेळप˜ीवर राहून संघासाठी अधिक धावा वसूल करायला पाहिजे होत्या. मी सध्या शिकत असून, काही बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी आशा आहे.'
- लोकेश राहुल, भारतीय सलामीवीर

Web Title: Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.