राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:59 AM2019-04-25T02:59:00+5:302019-04-25T02:59:22+5:30

आशियाई कुस्ती स्पर्धेत युवा भारतीय मल्लांची चमक

Rahul Aware won bronze; Amitla Silver | राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य

राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य

Next

शियान: अमित धनकर याला अंतिम लढतीत एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने बुधवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, राष्टÑकुल स्पर्धेचा विजेता असलेला महाराष्टÑाचा मल्ल राहुल आवारे याने कांस्य पदकावरील आपली पकड निसटू दिली नाही. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी केलेला राहुल आवरे यंदा प्रतिष्ठेचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ पुरस्काराचा मानकरीही ठरला होता.

२०१३ च्या आशियाई अजिंक्यपद सुवर्ण विजेत्या अमितला ७४ किलो फ्रीस्टाईल अंतिम लढतीत कझाखस्तानचा डेनियार केसानोवा याने ०-५ ने मात दिली. अमितने पात्रता फेरीत इराणचा मोहम्मद असगर नोखोदिलारिकीविरुद्ध २-१ असा विजय मिळवून शानदार सुरुवात केली. उपांत्यपूर्व लढतीत जपानचा युही फुजियामी दुखापतीमुळे बाहेर पडल्याने अमित उपांत्य फेरीत पोहोचला. यावेळी त्याने किर्गिस्तानचा मल्ल इलगिज झाकिपबेकोव याला ५-० ने लोळवले.

गोल्डकोस्ट राष्टÑकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेता राहुल आवारेला ६१ किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये कोरियाचा जिनचियोल किमकडून ९-२ ने पराभूत व्हावे लागले. आवारेने पात्रता फेरीत उझबेकिस्तानचा जाहोनगिरमिर्जा तुरोबोवचा तांत्रिक आधारे १०-० ने पराभव केला. उपांत्यपूर्व लढतीत मात्र आवारे इराणच्या ऐशग अहसनपूरकडून पराभूत झाला. अहसनपूरने अंतिम फेरी गाठल्याने आवारेला ‘रेपेचेज’ची संधी मिळाली. ही संधी साधत आवारेने थायलंडचा सिरिपोंग जुमपाकमविरुद्धची लढत १२-१ असा तांत्रिक आधारे जिंकली. (वृत्तसंस्था)

बुधवारच्या रौप्य आणि कांस्यसह भारताची पदक संख्या पाच झाली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यचा समावेश आहे. बजरंग पुुनियाने ६५ किलो गटात मंगळवारी सुवर्ण जिंकले तर प्रवीण राणा याने ७९ किलोचे रौप्य तसेच सत्यव्रत कादियानने
९७ किलोचे कांस्य जिंकले होते.

Web Title: Rahul Aware won bronze; Amitla Silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.