राहुल द्रविडने दुस-यांदा नाकारली डॉक्टरेट पदवी
By admin | Published: January 26, 2017 06:37 AM2017-01-26T06:37:29+5:302017-01-26T06:37:29+5:30
डॉक्टरेट पदवी मिळणं हे सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू , दि. 26 - डॉक्टरेट पदवी मिळणं हे सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. 27 जानेवारी रोजी बंगळुरू विद्यापिठाकडून द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती. मात्र, क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत द्रविडने ही पदवी घेण्यास नकार दिला.
बंगळुरू विद्यापिठाने 27 जानेवारी रोजी होणा-या 52 व्या दिक्षांत समारंभात 'द वॉल' अशी ओळख असलेल्या द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं. तसं प्रसिद्धीपत्रकंही विद्यापिठाकडून काढण्यात आलं होतं. याबाबत विद्यापिठाचे कुलगुरू बी थिमे गौड़ा म्हणाले, द्रविडला आम्ही डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं, त्याबाबत द्रविडने आमचे आभार मानले मात्र, क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत त्याने पदवी घेण्यास नकार दिला.
यापुर्वीही द्रविडने डॉक्टरेट पदवी घेण्यास नकार दिला होता. 2014 साली गुलबर्गा विद्यापिठाकडून 32 व्या दिक्षांत समारंभात त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.
2012 मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. सध्या द्रविड भारत 'अ' आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
Rahul Dravid declines Bangalore University Hon. degree, says would like to earn doctrate by accomplishing some academic research in sport pic.twitter.com/pP3xqo7EYz
— ANI (@ANI_news) 25 January 2017