राहुल, जडेजा, यादव चमकले
By admin | Published: March 31, 2017 12:51 AM2017-03-31T00:51:52+5:302017-03-31T00:51:52+5:30
आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात
- हर्षा भोगले -
आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबुन राहत होता. मात्र आता या मालिकेत के.एल. राहूल, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांची कामगिरी सुखावणारी ठरली.
एखाद्या समुद्र किनाऱ्यावर शांतपणे लाटा येतात. त्याच प्रमाणे वेळ गेल्यावर या मालिकेत निर्माण झालेले वाद मिटतील. क्रिकेट हा खेळ शानदार आहे. काही काळ निर्माण झालेले तणाव, हे खेळात होत असतात अणि हे बराच काळ लक्षातही राहतील.
ही मालिका सुरू होण्याआधी, बरेच जण विचार करत होते की, भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवेल. हा संघ कमकुवत
आहे. इंग्लंडला भारताने ४ -० असे पराभूत केले होते आणि त्यांचा भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभवही चांगला होता. पण आपण पाहिले की जसे अनुमान काढले गेले होते, त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाचा संघ चांगला खेळला. आॅस्ट्रेलियाने चांगल्या दर्जाचा खेळ केला. एकाच बाजुने बोलणे हे फॅशनेबल ठरेल. पण कालच सौरभ गांगुलीने म्हटल्याप्रमाणे मान्य केले पाहिजे की, आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. भारतीय संघही विकसीत झाला आणि संघातील राहूल, उमेश यादव, रविंद्र जाडेजा हे खेळाडू देखील चांगले विकसीत झाले आहेत. भारत कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबून राहू लागला होता. हे भारतीय क्रिकेटसाठी फारसे चांगले लक्षण नव्हते. कोहली हा कर्णधार म्हणून सर्वत्र होता. मात्र फलंदाज म्हणून त्याने फारसे योगदान दिले नाही. या मालिकेने दाखवून दिले की कोहली खेळला नाही, तरी भारतीय फलंदाजीत दम आहे.
गोलंदाजीतही आश्विन याने २१ गडी बाद केले असले तरी या मालिकेत यादव अणि जडेजा यांची कामगिरी सरस ठरली आणि मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी कुलदीप यादवही चमकला. कर्णधाराकडे चेंडु वळणारे आणि गडी बाद करणारे एकापेक्षा जास्त गोलंदाज असतील, तर त्या संघाचे भविष्य चांगले असते हेच भारतीय संघासोबत झाले आहे. आता आयपीएलची वेळ आली असून या स्पर्धेत खेळणे हे सोपे नसेल. या बहुआयामी स्पर्धेत खेळण्याची या खेळाडूंची ही अनोखी कसोटी असेल.