राहुलचा खेळ चकित करणारा!
By admin | Published: May 5, 2017 01:08 AM2017-05-05T01:08:26+5:302017-05-05T01:08:26+5:30
राहुल त्रिपाठी अचानक पटलावर आला आणि लोकप्रिय झाला. कुलदीप यादवच्या तीन चेंडूवर सलग षटकार खेचून त्याने केकेआरला
- रवी शास्त्री -
राहुल त्रिपाठी अचानक पटलावर आला आणि लोकप्रिय झाला. कुलदीप यादवच्या तीन चेंडूवर सलग षटकार खेचून त्याने केकेआरला पराभवाच्या खाईत लोटले. पुण्याने या युवा खेळाडूला यंदा सुरुवातीच्या सामन्यात बाहेर बसविले होते. आता मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनच त्याला खेळविण्यात आले.
स्टीव्ह स्मिथ, धोनी आणि बेन स्टोक्स यांच्या वर्चस्वात त्रिपाठीचे नाव कुणाच्याही ध्यानीमनी नसेल. लिलावादरम्यान पुणे संघाने त्याला घेतले तेव्हा फ्रेंचायसी प्रमुखाला विश्वास नसावा. त्याची किंमत १० लाख होती. मागच्या आठपैकी सात सामन्यात त्याने ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे योगदान दिले. यंदा पॉवर प्लेमध्ये त्याच्यापेक्षा अधिक धावा कुठल्याही फलंदाजाने केल्या नाहीत. डेव्हिड वॉर्नरदेखील यात मागे आहे. आश्चर्यकारक बाबी इथेच संपत नाहीत. सैनिकाचा मुलगा असलेल्या राहुलला मागच्या मोसमात आंतरराज्य टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडण्यात आले नव्हते. तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाज हीच त्याची मर्यादित ओळख होती. आयपीएलच्या या मोसमाआधी त्याने कधी सलामीला फलंदाजीही केली नव्हती.
सुरुवातीला असे मानले जायचे की, राहुल केवळ आॅफ साईडला चांगली फलंदाजी करतो. पण काल त्याने आॅन साईडलादेखील उपयुक्त फटके मारण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून मारला जाणारा फटका हे राहुलचे आणखी एक वैशिष्ट्य! ईडनवर अखेरच्या षटकात पाठोपाठ गडी बाद होत होते तेव्हा त्याने स्वत:च्या खेळात बदल केला. त्रिपाठीने पुण्याच्या प्रत्येक फलंदाजाला स्वत:च्या कामगिरीने मागे टाकले. पुण्याचा संघ प्ले आॅफसाठी दावेदार बनला असेल तर त्याचे सर्वात मोठे कारण राहुल हेच आहे. पुणे संघासाठी राहुल ही गुंतवणूक ठरावी आणि संघ व्यवस्थापनालादेखील गर्वाची अनुभूती होत असावी.
(टीसीएम)