सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीही पाऊस

By admin | Published: January 7, 2016 12:11 AM2016-01-07T00:11:47+5:302016-01-07T00:11:47+5:30

वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसदेखील पावसामुळे होऊ शकला नाही.

Rain for the fourth day in Sydney Test | सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीही पाऊस

सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीही पाऊस

Next

सिडनी : वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसदेखील पावसामुळे होऊ शकला नाही. बुधवारी एकही चेंडू न टाकला गेल्यामुळे हा सामना अनिर्णीत ठरण्याची शक्यता आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवशीच पावसाने अडथळा आणला होता आणि ७५ षटकांचाच खेळ शक्य झाला. दुसऱ्या दिवशी तर ११.२ षटकांचाच खेळ झाला आणि
तिसऱ्या व चौथ्या दिवशी सातत्याने पाऊस झाल्याने खेळाडू मैदानावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ही
लढत अनिर्णीत ठरण्याचीच शक्यता आहे.
वेस्ट इंडीजने त्यांच्या पहिल्या डावात ७ बाद २४८ धावा केल्या आहेत. संघाकडून सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ८५ धावा केल्या, तर कार्लोस ब्रेथवेटने ६९ व डॅरेन ब्राव्होने ३३ धावांची खेळी केली. दिनेश रामदिन (३०) व केमार रोच (०) हे नाबाद आहेत.(वृत्तसंस्था)

Web Title: Rain for the fourth day in Sydney Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.