सराव सत्रात दिसली रैना-मलिकची मैत्री

By admin | Published: March 18, 2016 03:25 AM2016-03-18T03:25:52+5:302016-03-18T03:32:49+5:30

विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत-पाक दरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. मैदानावर एकमेकांसमोर अडचण निर्माण करणाऱ्या खेळाडूंची सराव सत्रात मात्र मैत्री पाहायला मिळाली.

Raina-Malik's friendship seen in the practice session | सराव सत्रात दिसली रैना-मलिकची मैत्री

सराव सत्रात दिसली रैना-मलिकची मैत्री

Next

कोलकाता : विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत-पाक दरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. मैदानावर एकमेकांसमोर अडचण निर्माण करणाऱ्या खेळाडूंची सराव सत्रात मात्र मैत्री पाहायला मिळाली.
भारताचा आघाडीचा फलंदाज सुरेश रैना व पाकिस्तानचा शोएब मलिक एकमेकांची गळाभेट घेताना व हस्तांदोलन करताना आज दिसले. हा क्षण छायाचित्रकारांनी लगेचच टिपला.
रैनाला पाहताच मलिक त्याच्याजवळ गेला व त्याच्याशी गप्पा मारल्या. बांगलादेशवर ५५ धावांनी विजय मिळविल्यानंतर पाकिस्तानने आपल्या काही फलंदाज व गोलंदाजांशिवाय सराव केला.
भारताकडून अजिंक्य रहाणे, पवन नेगी यांनी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला.
मलिकने यावेळी आपल्या हातमोज्यांची जोडी स्थानिक गोलंदाज राजीव केशरी याला दिली.

Web Title: Raina-Malik's friendship seen in the practice session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.