रैना की जाधव, धोनी द्विधा मनस्थितीत
By admin | Published: October 18, 2016 08:03 PM2016-10-18T20:03:37+5:302016-10-18T20:13:49+5:30
तापामुळे न्युझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकलेला मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - तापामुळे न्युझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकलेला मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूमध्ये त्याची निवड कोणाच्या जागेवर करायची असा प्रश्न धोनीपुढे उभा आहे. पहिल्या सामन्यात संधी मिळालेल्या महाराष्ट्राच्या केदार जाधवने उत्कृष्ट कामगिरी करताना गालंदाजीत २ षटकात ६ धावा देत २ बळी मिळवले होते, तर फलंदाजीत कोहलीसोबत ३२ धावांची भागिदारी करताना नाबाद १० धावा केल्या होत्या. कामगिरीमध्ये सातत्य नसल्यामुळे सुरेश रैना संघाच्या बाहेर होता. त्यामुळे तो फॉर्ममध्ये आहे का? हा मोठा प्रश्न धोनीपुढे असेल. त्याचप्रमाणे ऑफ स्पिनर जयंत यादव हा एक पर्याय धोनीपुढे असेल.
दरम्यान, मनिष पांडेने पहिल्या सामन्यात १७ धावा काढल्या होत्या पण तो फॉर्ममध्ये होता. मागील काही सामन्यात त्याने सातत्याने चागंली कामगिरी केली आहे. धोनीपुढे सध्या केदार जाधव आणि सुरैश रैना यापैकी कोणाला संधी द्यायची ही द्विधा मनस्थिती आहे. पहिल्या सामन्यात अक्षर पटेलने ९ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा खर्च करुन एकही गडी बाद केला नव्हता. त्यामुळे धोनी रैनासाठी केदार जाधव, मनिष पांडे आणि अक्षर पटेल यापैकी कोणाला बाहेर बसवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.