रेनशॉने कोहलीच्या ‘टायलेट ब्रेक’ शेरेबाजीला टाळले
By admin | Published: March 6, 2017 12:05 AM2017-03-06T00:05:28+5:302017-03-06T00:05:28+5:30
आॅस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱ्यात आतापर्यंत केलेल्या फलंदाजीवरुन तो वयाच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचे दिसून येत आहे.
बेंगळुरु : आॅस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱ्यात आतापर्यंत केलेल्या फलंदाजीवरुन तो वयाच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचे दिसून येत आहे. रविवारी विराट कोहलीने केलेल्या शेरेबाजीला उत्तर देण्यात तो यशस्वी ठरला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात आज, रविवारी कोहलीने सातत्याने शेरेबाजी केली. भारतीय संघ आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यासाठी संघर्ष करीत होता. आॅस्ट्रेलियाने दिवसअखेर ४८ धावांची आघाडी घेतली.
कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यादरम्यान सातत्याने बातचित होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर भारतीय कर्णधाराने रेनशॉने पुणे कसोटीदरम्यान घेतलेल्या ‘टॉयलेट ब्रेक’ची आठवण करून देताना त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. या सलामीवीराने दडपण न बाळगता १९६ चेंडूंना सामोरे जात ६० धावांची खेळी केली.
खेळपट्टीवर घडलेल्या प्रसंगाबाबत विचारले असता, रेनशॉ म्हणाला, ‘मी याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होतो. कोहलीच्या शेरेबाजीवर हसत होतो. कारण त्यातील काही बाबी फारच विनोदी होत्या. तो मला टॉयलेटला जाण्याची आठवण करून देत होता. ते फारच विनोदी होते.’
उभय संघांतील कर्णधारादरम्यान झालेल्या वाक् युद्धाबाबत बोलताना रेनशॉ म्हणाला,’ काहीतरी नक्की घडले. कारण स्मिथ व कोहली एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करीत होते. कोहली शेरेबाजी करीत असताना तो प्रेक्षकांना सामील करून घेत होता. (वृत्तसंस्था)
> भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या ‘ओव्हर द विकेट’ मारा करण्याच्या रणनीतीचा लाभ झाला. ‘ओव्हर द विकेट’ गोलंदाजीमुळे तो काय करणार आहे, याची कल्पना येत होती. आम्ही पहिल्या डावात चांगली आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. -