इंग्लंडच्या आघाडीत पावसाचा खोडा

By admin | Published: August 9, 2014 12:36 AM2014-08-09T00:36:07+5:302014-08-09T00:36:07+5:30

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुस:या दिवशी पावसाने आणि भारतीय फलंदाजांनी खोडा घातल्याने इंग्लंडला मोठी आघाडी घेता आली नाही.

Rains of England lead | इंग्लंडच्या आघाडीत पावसाचा खोडा

इंग्लंडच्या आघाडीत पावसाचा खोडा

Next
>भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुस:या दिवशी पावसाने आणि भारतीय फलंदाजांनी खोडा घातल्याने इंग्लंडला मोठी आघाडी घेता आली नाही. पहिल्या चेंडूपासून पावसाच्या छायेखाली सुरू असलेल्या सामन्याच्या दुस:या दिवशी उपाहार ते चहापानादरम्यानच्या काळात फक्त 9 षटकांचा खेळ होऊ शकल्याने इंग्लंडला 85 धावांची आघाडी मिळाली होती. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 237 धावा झाल्या होत्या. 
त्यानंतर दिवसअखेरीर्पयत खेळ होऊ शकला नाही. खेळपट्टीवर इंग्लंडचे ज्यो रूट 48 आणि जोस बटलर 22 धावांवर खेळत होते. दरम्यान,  उद्या, शनिवारी सकाळी आकाश स्वच्छ असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 
इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी उपाहारानंतर 36 धावा केल्या. यानंतर पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला. पावसामुळे आउटफिल्ड ओले झाले होते; तसेच सीमारेषेजवळ काही ठिकाणी पाणी साचले होते. 
तत्पूर्वी, भुवनेश्वर कुमार (47 धावांत 3 बळी) आणि वरुण अॅरोन (48 धावांत 3 बळी) यांनी पहिल्या सत्रत तीन बळी घेत भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. या दोघांनी इंग्लंडला 6 बाद 201 असे बॅकफूटवर ढकलले होते; परंतु रूट आणि बटलर यांनी डाव सावरला. भुवनेश्वर आणि अॅरोन यांनी सकाळी इयान बेल (58), ािस जॉर्डन (12) आणि मोईन अली (13) यांना तंबूत पाठविले. 
सकाळी आकाश आभ्राच्छादित झाले होते; पण दिवस वर येईल तसे ढग पांगू लागले. काल, गुरुवारी अशा वातावरणाचा फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला होता. आजच्या परिस्थितीचा भारतीय गोलंदाज फायदा घेतील असे वाटत होते; परंतु पहिल्याच षटकात 21 धावा दिल्या गेल्या. बेलने 45 धावांवरून पुढे खेळताना दुस:याच षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले; परंतु यानंतर लगेचच भुवनेश्वर कुमारच्या शॉर्टपिच चेंडूवर नाईट वॉचमन जॉर्डनला अॅरोनकरवी ङोलबाद केले. यानंतर दोन षटकांनंतर भुवनेश्वरने भारताला इयान बेलचा महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. आउटस्विंगर खेळताना बेलच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर गेला. ‘झारखंड स्टार’ वरुण अॅरोनने सातत्याने 99 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करीत होता. याचा मोबदला त्याला मिळाला. त्याच्या फास्ट फुलस्विंगवर मोईन अलीचा त्रिफळा उडाला. मोईनला बाद करून त्याने भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र रूट आणि बटलर यांनी डाव सावरला. दोघांनी भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. जो रूट मालिकेतील फॉर्म पुढे चालवायलाच आला आहे, असे वाटत आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने चांगले फुटवर्क दाखविले. फिल्डिंगमधील गॅप शोधून त्याने चांगले फटके मारले. साउथॅम्पटनमध्ये तडाखेबंद खेळी करणारा जोस बटलर आज संयमाने फलंदाजी करीत होता. दिवसअखेरीस इंग्लंडकडे 85 धावांची आघाडी असून त्यांचे चार फलंदाज शिल्लक आहेत.
 
भारत पहिला डाव :-  46.4 षटकांत सर्व बाद 152; इंग्लंड पहिला डाव 
(3 बाद 113 पासून पुढे) : इयान बेल ङो. धोनी गो. कुमार 58, ािस जॉर्डन ङो अॅरोन गो. कुमार 13, जो रुट खेळत आहे 48, मोईन अली  त्रि. गो. अॅरोन 13, ज्योस बटलर खेळत आहे 22; अवांतर : 23; एकूण 71 षटकांत 6 बाद 237 ; गडी होण्याचा बाद क्रम : 4/136, 5/14क्, 6/17क्; गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 18-6-47-3, पंकज सिंग 17-2-79-क्, वरुण अॅरोन 16-2-48-3, आर.  आश्विन 13-1-28-क्, रवींद्र जडेजा 7-क्-21-क्
 

Web Title: Rains of England lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.