मुंबईच्या राज सुर्वेने पटकावला राष्ट्रीय ज्युनियर भारत श्री किताब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:18 PM2019-02-12T19:18:44+5:302019-02-12T19:21:26+5:30
राष्ट्रीय जुनियर शरीरसौष्ठव स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
मुंबई : जम्मू काश्मीर येथे यावर्षी झालेल्या राष्ट्रीय जुनियर शरीरसौष्ठव स्पर्धेत ६० ते ८० किलो वजनी जुनियर गटाचे सुवर्ण पदक जिंकून मुंबईचा राज सुर्वेने राष्ट्रीय जुनियर भारत-श्री किताब जिंकला आहे .यावर्षी जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय शरीर शौष्ट्व स्पर्धेत जुनियर गटात २१ राज्यामधून एकूण २१० स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धकांमध्ये विविध वजनी गटाच्या प्राथमिक फेऱ्या पारपडून विविध गटातील विजेत्यांच्या अंतिम फेरीमधून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत राज सुर्वेने राष्ट्रीय जुनियर भारतश्री किताब जिंकला आहे. तसेच दुसरा क्रमांक राजस्थानच्या आर्यन चौहान आणि तिसरा क्रमांक ओडीसाच्या किशोर चंद्र जॉयने पटकावला आहे.
मुंबई मधील आर्कीटेक्त अभ्यासक्रमाचा विध्यार्थी असणार्या राज सुर्वेने यापूर्वी जुनियर मुंबई-श्री तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हे किताब पटकावले होते. 'भारत-श्री स्पर्धेकरिता तयारी करण्याकरिता मी ८ तास सराव , खाण्याची पत्थे आणि सातत्य आणि एकाग्रता यावर भर दिला तसेच आय बीबी एफचे श्री संजय मोरे माझे प्रशिक्षक विशाल सावंत, मंदार अगवनकर आणि नरेंद्र कदम आणि माझे आई बाबा यांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठींब्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो,' असे अशी प्रतिक्रिया राज सुर्वे याने हा किताब जिंकल्यानंतर दिली.
'राजने अथक परिश्रम केल्यानेच त्याने हा किताब जिंकला आहे तसाच मुंबईमध्ये हा किताब आला याचा आनंद आहे,' अशी प्रतिक्रिया त्याचे प्रशिक्षक विशाल सावंत यांनी दिली आहे .