मुंबईविरुद्ध राजस्थानचा हल्लाबोल

By admin | Published: April 14, 2015 12:54 AM2015-04-14T00:54:12+5:302015-04-14T00:54:12+5:30

सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Rajasthan face attack against Mumbai | मुंबईविरुद्ध राजस्थानचा हल्लाबोल

मुंबईविरुद्ध राजस्थानचा हल्लाबोल

Next

तगडे आव्हान : विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्यास रॉयल्स प्रयत्नशील
अहमदाबाद : सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अहमदाबाद येथील घरच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळणारा राजस्थान रॉयल्स मुंबईविरुद्ध बाजी मारून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसऱ्या बाजूला कागदावर बलाढय वाटणारे मुंबईकर मोसमातील पहिला विजय मिळवण्यास पूर्ण ताकदीनिशी उतरतील.
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच राजस्थानचे एक वैशिष्ट्य राहिले आहे. ते म्हणजे, या संघात फारसे लौकिक नसलेल्या खेळाडूंचा असलेला समावेश. मात्र हेच खेळाडू प्रत्यक्ष मैदानात प्रतिस्पर्ध्यांची ‘दांडी’ गुल करण्यात माहीर
आहेत. त्यामुळेच कोणताही संघ राजस्थानला कधीच कमी लेखण्याची चूक करीत नाही.
अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन यांसारख्या मुख्य खेळाडूंसोबतच हुडावरदेखील साऱ्यांचे लक्ष असेल. फलंदाजीमध्ये हा संघ रहाणे, स्मिथ, कर्णधार वॉटसन, हुडा यांच्यावर अवलंबून असून गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे मॉरिस, फॉल्कनर, टीम साऊदी, प्रवीण तांबे आणि वॉटसन असा ताफा आहे.
त्याचवेळी मुंबईची स्थिती मात्र बेताचीच आहे. कागदावर हा संघ जबरदस्त मजबूत दिसत असला तरी संथ सुरुवात आणि दडपणामुळे मुंबईचा खेळ खालावतो. याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघांना होतोय. (वृत्तसंस्था)

च्मुंबईकडे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि रिकी पाँटिंग याचा तगडा व अनुभवी सपोर्टिंग स्टाफ असूनही संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे.
च्अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू पूर्णपणे फ्लॉप ठरलेत, तर पहिल्या सामन्यातील अर्धशतकानंतर धडाकेबाज कोरी अँडरसनदेखील मुंबईत अपयशी ठरला. पोलार्ड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनादेखील खेळ उंचावण्याची गरज आहे.
च्या फलंदाजांपैकी दोघांची जरी बॅट तळपली, तर मात्र समोर कोणताही संघ असो, त्यांच्या चिंधड्या उडणार हे नक्की. त्यामुळेच मुंबईला गरज आहे ती फक्त फलंदाज फॉर्ममध्ये येण्याची. गोलंदाजीमध्ये हरभजन, सुचित यांची फिरकी, तर विनयकुमार, मलिंगा, पोलार्ड यांचा वेगवान मारा मुंबईला तारू शकेल.

रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू, अभिमन्यू मिथुन, आदित्य तरे, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, कोरी अँडरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, प्रग्यान ओझा, मचेल मैकक्लीगन, एडेन ब्लीजार्ड, अक्षय वाखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि विनयकुमार.

शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, बेन कटिंग, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, जुआन थेरोन, बरिंदर सिंग सरन, दिनेश साळुंखे, सागर त्रिवेदी आणि प्रदीप साहू.

Web Title: Rajasthan face attack against Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.