राजस्थान रॉयल्स पुढे 128 धावांचे आव्हान
By admin | Published: April 16, 2015 09:40 PM2015-04-16T21:40:30+5:302015-04-16T21:43:42+5:30
वीस षटकांत पाच गडी गमावत हैद्राहाद सनरायजर्सने जेमतेम 128 धावा केल्या आहेत. सनरायजर्सच्या फलंदाजांना 30 धावा करता आल्या नाहीत.
Next
>ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम,दि. 16 - नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
वीस षटकांत पाच गडी गमावत हैद्राहाद सनरायजर्सने जेमतेम 128 धावा केल्या आहेत. सनरायजर्सच्या फलंदाजांना 30 धावा करता आल्या नाहीत. धवल कुलकर्णी व प्रविण तांबे ने प्रत्येकी दोन गडी बाद केले. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर शिखर धवन 10 धआवा करत तंबूत परतला तर, के एल राहूल अवघ्या दोन धावा करत तंबूत परतला. नमन ओझा याला अंपायरने बाद ठरवले होते परंतू, अंतिम निर्णयात त्याला फ्रि हिट देण्यात आली. परंतू प्रविण तांबेच्याच गोलंदाजीवर 25 धावांवर त्याचा बळी गेला. आशीष रेड्डीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.