राजस्थानची बाद फेरी निश्चित

By admin | Published: May 17, 2015 01:23 AM2015-05-17T01:23:17+5:302015-05-17T01:23:17+5:30

राजस्थान रॉयल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला ९ धावांनी नमवून प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले.

The Rajasthan Royals' final | राजस्थानची बाद फेरी निश्चित

राजस्थानची बाद फेरी निश्चित

Next

वॉटसनचा दणका : गतविजेत्यांना ९ धावांनी नमवले
मुंबई : कर्णधार शेन वॉटसनच्या धमाकेदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला ९ धावांनी नमवून प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले.
ब्रेबॉन स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक होता. प्रथम फलंदाजी करताना यजमान राजस्थानने कोलकाता समोर विजयासाठी २०० धावांचे कठीण आव्हान ठेवले. कर्णधार गौतम गंभीर (१) आणि रॉबिन उथप्पा (१४) ही सलामीची जोडी झटपट परतल्याने कोलकाताची २ बाद २१ अशी अवस्था झालेली. मनिष पांड्ये (२१), युसुफ पठाण (४४) आणि आंद्रे रसेल (३७) यांनी निर्णायक फटकेबाजी करताना सामना जवळजवळ कोलकाताच्या बाजूने झुकवला होता. रसेल - पठाण यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. अखेर ख्रिस मॉरीसने रसेलचा अडसर दूर केला. रसेलने २० चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा काढल्या. अंतिम क्षणी उमेश यादवने (२२) हल्ला चढवताना कोलकाताच्या आशा उंचावल्या होत्या. अखेरच्या षटकांत विजयासाठी १६ धावांची गरज असताना मॉरिसने टिच्चून मारा केला. मॉरिसने सर्वाधिक ४ तर धवल कुलकर्णीने व शेन वॉटसनने प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी शेन वॉटसनच्या ५९ चेंडूतील नाबाद १०४ धावांच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर राजस्थानने ६ बाद १९९ धावा उभारल्या. रहाणेने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या साह्याने २२ चेंडूत ३७ धावा केल्या. रहाणे धावबाद झाल्यानंतर राजस्थानच्या पडझडीस सुरुवात झाली. स्मिथने १४ धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन (८) व फॉल्कनर (६) यांना स्वस्तात बाद झाल्याने राजस्थानची ४ बाद १४० अशी अवस्था झाली. कर्णधार वॉटसनने मात्र चौफेर टोलेबाजी सुरुच ठेवली होती. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांच्या साह्याने नाबाद १०४ धावा केल्या. करुण नायरने तीन चौकाराच्या साह्याने १६ धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन बळी घेतले. उमेश यादवने १ बळी मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)

राजस्थान रॉयल्स : रहाणे धावचीत ३७, शेन वॉटसन नाबाद १०४, स्टीव्हन स्मिथ झे. मॉर्केल गो. रसेल १४, संजू सॅमसन झे. गंभीर गो. रसेल ८, फॉल्कनर झे. यादव गो. रसेल ६, कुलदिप नायर झे. उथ्थाप्पा गो. यादव १६, मॉरिस धावचीत ४, अवांतर ६, एकूण २० षटकांत ६ बाद १९९.
गोलंदाजी : अझर मेहमूद ३-०-४१-०; मॉर्केल ४-०-३८-०; उमेश यादव ४-०-३६-१; शाकीब उल हसन ४-०-३६-०; आंदे्र रसेल ४-०-३२-३; पीयुष चावला १-०-१२-०

कोलकाता नाइट रायडर्स: रॉबिन उथप्पा झे. स्मिथ गो. कुलकर्णी १४, गौतम गंभीर झे. बिन्नी गो. मॉरिस १, मनिष पांड्ये झे. मॉरिस गो. कुलकर्णी २१, युसुफ पठाण झे. कुलकर्णी गो. वॉटसन ४४, आंद्रे रसेल झे. कुलकर्णी गो. मॉरिस ३७, सुर्यकुमार यादव झे. सॅमसन गो. मॉरिस ०, शाकिब अल हसन झे. स्मिथ गो. मॉरिस १३, अझर मेहमूद झे. रहाणे गो. फॉल्कनर ६, पियुष चावला झे. बिन्नी गो. वॉटसन ०, उमेश यादव नाबाद २४, मॉर्नी मॉर्केल नाबाद ४. अवांतर -२६. एकूण: २० षटकांत ९ बाद १९० धावा
गोलंदाजी: मॉरिस ४-०-२३-४; बी सरन ३-०-३५-०; कुलकर्णी ४-०-३६-२; फॉल्कनर ४-०-४५-१; वॉटसन ४-०-३८-२; बिन्नी १-०-१०-०.

Web Title: The Rajasthan Royals' final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.