राजीव शुक्ला पुन्हा आयपीएलवर

By admin | Published: April 7, 2015 04:08 AM2015-04-07T04:08:46+5:302015-04-07T04:08:46+5:30

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महिनाभरापासून आयपीएल संचालन

Rajeev Shukla again on IPL | राजीव शुक्ला पुन्हा आयपीएलवर

राजीव शुक्ला पुन्हा आयपीएलवर

Next

नवी दिल्ली : राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते असलेले शुक्ला २०१३ पर्यंत आयपीएलचे अध्यक्ष होते; पण आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, अजय शिर्के आणि रंजीब बिस्वाल यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती, पण अखेर शुक्ला यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. कोलकातामध्ये आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद््घाटन कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी शुक्ला यांची नियुक्ती झाली. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले, तर काँग्रेसचे नेते व एमपीसीएचे प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे वित्त समितीचे प्रमुख असतील. गोव्याचे चेतन देसाई विपणन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणार असून, आंध्रचे गोकाराजू गंगराजू यांच्याकडे दौरा व कार्यक्रम समितीचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष विश्वरूप डे मीडिया समितीचे नवे प्रमुख असतील. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एफिलेशन समिती नावाची नवी समिती स्थापन करण्यात आली असून, बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आता स्वत: संविधान समीक्षण समितीचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. शुक्ला त्यांना सहकार्य करतील. भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा समितीच्या (एसीएसयू) उपसमितीची निवड सध्या टाळण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rajeev Shukla again on IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.