राजेश येमूलचे सहा चेंडूत सहा षटकार, दीपक राजूलचे शतक मार्कंडेय प्रिमियर लीग

By Admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:14+5:302015-08-23T20:40:14+5:30

सोलापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े र्शावणी कॉम्प्युटर्सच्या राजेश येमूल याने एकाच षटकात सलग 6 षटकार खेचून नाबाद 57 धावांची खेळी केली़ त्यामुळे र्शावणी कॉम्युटर्स संघाने बिटला परिवार संघावर 2 षटक, 4 चेंडू आणि 6 गडी शिल्लक राखून मात करीत शानदार विजय मिळवला़ बिटला परिवार संघाने 10 षटकात 122 धावा केल्या़ यात वरुण बुर्ला 26, रवी चिंताकिंदीने 24 धावा केल्या़ प्रत्युत्तरात र्शावणी कॉम्प्युटर्सकडून राजेश येमूलने एकाच षटकात सलग सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला़ राकेश

Rajesh Yemul's six sixes in six balls, Deepak Rajul's century hit Markandeya Premier League | राजेश येमूलचे सहा चेंडूत सहा षटकार, दीपक राजूलचे शतक मार्कंडेय प्रिमियर लीग

राजेश येमूलचे सहा चेंडूत सहा षटकार, दीपक राजूलचे शतक मार्कंडेय प्रिमियर लीग

googlenewsNext
लापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े र्शावणी कॉम्प्युटर्सच्या राजेश येमूल याने एकाच षटकात सलग 6 षटकार खेचून नाबाद 57 धावांची खेळी केली़ त्यामुळे र्शावणी कॉम्युटर्स संघाने बिटला परिवार संघावर 2 षटक, 4 चेंडू आणि 6 गडी शिल्लक राखून मात करीत शानदार विजय मिळवला़ बिटला परिवार संघाने 10 षटकात 122 धावा केल्या़ यात वरुण बुर्ला 26, रवी चिंताकिंदीने 24 धावा केल्या़ प्रत्युत्तरात र्शावणी कॉम्प्युटर्सकडून राजेश येमूलने एकाच षटकात सलग सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला़ राकेश पुंजालने 35 धावा करीत त्याला सुरेख साथ दिली़
अन्य सामन्यात प्रशांत हॉटेल संघाचा कर्णधार दीपक राजूलने 10 षटकार, 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या़ प्रत्युत्तरात प्रशांत संघाने मोनिका इलेक्ट्रॉनिक्सच्या संघाच्या 10 षटकात 138 धावांच्या प्रत्युत्तरात 7़5 षटकात बिनबाद 140 धावा काढून विजयी लक्ष्य गाठल़े तसेच बिटला परिवार संघाने नगरसेवक पांडुरंग दिड्डीकाका संघाचा पराभव केला़ बालाजी गार्डन्स संघाने एस़एऩ चिलका सिल्क सारीज संघाचा पराभव करीत आगेकूच केली़ स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा राजू उडता, रवींद्र संगा, दत्ता पाटील, महेश कोठे, अश्विन बिटला यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़ेयावेळी सुरेश फलमारी, पांडुरंग दिड्डी, अँड़ र्शीनिवास क्यातम उपस्थित होत़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Rajesh Yemul's six sixes in six balls, Deepak Rajul's century hit Markandeya Premier League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.