राजकोट कसोटी : पहिल्या डावात पाहुण्यांच्या ५३७ धावा, भारत बिनबाद ६३

By admin | Published: November 11, 2016 01:09 AM2016-11-11T01:09:43+5:302016-11-11T01:09:43+5:30

ज्यो रुट (१२४), मोईन अली (११७) आणि बेन स्टोक्स (१२८) या तिघांच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर पाहुण्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची हवा गुल करून गुरुवारी पहिल्या

Rajkot Test: 537 runs in the first innings, India without 63 | राजकोट कसोटी : पहिल्या डावात पाहुण्यांच्या ५३७ धावा, भारत बिनबाद ६३

राजकोट कसोटी : पहिल्या डावात पाहुण्यांच्या ५३७ धावा, भारत बिनबाद ६३

Next

राजकोट : ज्यो रुट (१२४), मोईन अली (११७) आणि बेन स्टोक्स (१२८) या तिघांच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर पाहुण्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची हवा गुल करून गुरुवारी पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात १५९.३ षटकांत तब्बल ५३७ धावांचा डोंगर रचला. यामुळे भारत दडपणाखाली आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने मालिका जिंकताच तोऱ्यात वावरणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा इंग्लिश फलंदाजांनी उघड केल्या.
भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २३ षटकांत बिनबाद ६३ अशी मजल मारली. भारतीय संघ पाहुण्यांच्या तुलनेत ४७४ धावांनी मागे असून १० गडी शिल्लक आहेत. मुरली विजय ७० चेंडूंत ४ चौकारांसह २५ आणि डावखुरा फलंदाज गौतम गंभीर ६८ चेंडू टोलवून ४ चौकारांसह २८ धावांवर नाबाद आहेत.
इंग्लंडने आज सकाळी कालच्या ४ बाद ३११वरून पुढे खेळ सुरू केला. मोईन ९९ आणि स्टोक्स १९ धावांवर होते. दोघेही आक्रमक खेळल्याने उपाहारापर्यंत ६ बाद ४५० धावा होत्या. २९ वर्षांच्या मोईनने १९५ चेंडंूत करिअरमधील शतक गाठले.
मोहंमद शमीने त्याला बाद करण्याआधी स्टोक्ससोबत त्याने पाचव्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी केली. २५ वर्षांच्या स्टोक्सनेदेखील चौथे कसोटी
शतक पूर्ण केले. जॉनी बेरेस्टॉ हा
४४२ धावांवर शमीचा बळी
ठरला. स्टोक्सने नवव्या गड्यासाठी जफरसोबत ५२ धावांची भागीदारी केली. जफरला मिश्राने पायचित करताच इंग्लंडचा पहिला
डाव आोटपला. (वृत्तसंस्था)


सकलेनने संयम शिकविला : मोईन
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक ठोकले ते संयमाच्या बळावरच! इंग्लंड संघाचे फिरकी गोलंदाजी सल्लागार सकलेन मुश्ताक यांनी मला हा संयम शिकविल्यामुळे मी मोठी खेळी करू शकलो, असे शतकवीर मोईन अली याचे मत आहे.
मोईनने ११७ धावा केल्या. दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर मोईन म्हणाला, ‘‘येथे चेंडू चांगले वळण घेत होता. काही चेंडू रिव्हर्स स्विंगदेखील होताना दिसायचे. या खेळपट्टीवर फिरकी चेंडू फार लवकरच वळण घेत होते. तरीही संयम राखला. संयम राखण्याचे तंत्र मला सकलेनने शिकविले. खेळताना नेहमी संयम पाळा आणि साहस कायम राखून खेळा, असे सकलेन नेहमी सांगतात. कालच्या फलंदाजीनंतर माझ्या पायात जडपणा आला होता. दुसऱ्या दिवशी फलंदाजीला जाताना अस्वस्थ वाटत होते, थकवा जाणवत होता; पण मी संयम राखून खेळलो.’’


इंग्लंडसाठी ज्यो रुटने
१८० चेंडंूत ११ चौकार व एका षटकारासह १२४, मोईन अली याने २३१ चेंडूंत १३ चौकारांसह ११७ आणि बेन स्टोक्स याने २३५ चेंडूंत १३, चौकार व दोन षटकारांसह १२८ धावा ठोकल्या. जॉनी बेरोस्टॉने ४६ तसेच जफर अन्सारीने ३२ धावांचे योगदान दिले.

विकेट घेणे ही सांघिक जबाबदारी: जडेजा
राजकोट : विकेट घेणे ही कोणाएका गोलंदाजाची जबाबदारी नाही, तर ती सांघिक जबाबदारी असल्याचे सांगून रवींद्र जडेजा याने राजकोट कसोटीत पहिल्या डावात कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या रविचंद्रन आश्विनचा बचाव केला.
दुसऱ्या दिवशी जडेजा म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत फिरकीला अनुकूलता दिसली नाही. आमच्याकडे पाच गोलंदाज असल्याने विकेट घेण्याची जबाबदारी केवळ आश्विनचीच नाही, तर आम्हा पाचही जणांची आहे.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव (कालच्या ४ बाद ३११ वरून) :
अ‍ॅलिस्टर कूक पायचित गो. जडेजा २१, हसीब
हमीद पायचित गो. आश्विन ३१, ज्यो रुट झे. आणि
गो. यादव १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. आश्विन १३, मोईन अली त्रि. गो. शमी ११७, बेन स्टोक्स झे.
साहा गो. यादव १२८, जॉनी बेरेस्टॉ झे. साहा गो.
शमी ४६, ख्रिस व्होग्स झे. साहा गो. जडेजा ४, आदील रशीद झे. यादव गो. जडेजा ५, जफर अन्सारी पायचित गो. मिश्रा ३२, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ६. अवांतर : १०, एकूण : १५९.३ षटकांत सर्व बाद ५३७ धावा.
गडी बाद क्रम : १/४७, २/७६, ३/१०२, ४/२८१, ५/३४३, ६/४४२, ७/४५१, ८/४६५,९/५१७. गोलंदाजी : शमी २८.१-५-६५-२, यादव
३१.५-३-११२-२, आश्विन ४६-३-१६७-२, जडेजा ३०-४-८६-३, मिश्रा २३.३-३-९८-१.
भारत पहिला डाव : मुरली विजय खेळत
आहे २५, गौतम गंभीर खेळत आहे २८. अवांतर : १०, एकूण : २३ षटकांत बिनबाद ६३ धावा. गोलंदाजी : ब्रॉड
५-१-२०-०, व्होक्स ७-२-१७-०, मोईन ६-२-६-०, अन्सारी ३-०-३-०, रशीद २-०-८-०.

Web Title: Rajkot Test: 537 runs in the first innings, India without 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.