राकेश कुलकर्णीची आगेकूच कायम
By Admin | Published: April 20, 2017 04:23 AM2017-04-20T04:23:43+5:302017-04-20T04:23:43+5:30
फिडे अग्रगुणांकित राकेश कुलकर्णीने पुण्याच्या रणवीर मोहितेवर
मुंबई : फिडे अग्रगुणांकित राकेश कुलकर्णीने पुण्याच्या रणवीर मोहितेवर दहाव्या साखळी सामन्यात २८ व्या चालीत मात करुन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ९ गुणांसह आगेकूच कायम राखली आहे. चिन्मय कुलकर्णी ८.५ गुणांसह स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे.
युनिव्हर्सल चेस फाऊंडेशन व दहिसर स्पोटर््स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या या स्पर्धेत रणवीरला सातत्य राखण्यात अपयश आले. याचा फायदा अनुभवी राकेश कुलकर्णीने घेत सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. पटलावर वेगवान
व आक्रमक चाली रचत राकेशने रणवीरवर जबरदस्त दडपण आणले आणि २८ व्या चालीत बाजी मारली.
दुसरीकडे, इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे आणि चिन्मय कुलकर्णी यांच्यातील सामना १५ व्या चालीमध्ये बरोबरीत सुटला. यासह चिन्मयने ८.५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
विक्रमादित्य कुलकर्णी आणि सौरव खेर्डेकर यांच्यातील
सामना देखील बरोबरीत सुटला. रंगतदार झालेल्या सामन्यात सौरवकडे दोन प्याद्यांचे अधिक्य
होते. त्यातच राजा विरुद्ध
वजिराच्या अंतिम डावात शह देण्याची पुनरावृत्ती झाल्याने तांत्रिकदृ्ष्ट्या सामना बरोबरीत निघाला. विक्रमादित्य आणि सौरवसह अतुल डहाळे, ओमकार कडव, समीर कठमाळे यांनी ८ गुणासंह स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी)