रॅली टू द व्हॅलीने रचला विक्रम : महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली सर्वात मोठी रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:58 AM2019-04-09T09:58:34+5:302019-04-09T09:58:52+5:30
जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला.
मुंबई : जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला. जागतिक स्तरावर महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ठरली सर्वात मोठी रॅली ठरली आहे. जे के मोटरस्पोर्ट्सने आयोजित केलेल्या या रॅलीत 600 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे संपूर्ण इव्हेंट सर्वच विभागात महिलांचा समावेश होता.
या इव्हेंटचा भाग झाल्याने मी उत्साहित आहे. असे जे के मोटरस्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले. आम्ही नेहमीच महिलांच्या रॅलीला प्रोत्साहन देत आलो आहोत.महिलांनी आयोजित केलेली ही रॅली विशेष आहे असे ते पुढे म्हणाले.आम्ही अनेक रॅलीचे यापूर्वी आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे डब्ल्यूआयएए अध्यक्ष नितीन डोसा म्हणाले.काही महिलांनी या रॅलीची कल्पना आमच्याकडे घेऊन आल्या. ज्यामध्ये सर्वच विभागात महिलांचा समावेश असेल. या रॅलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना पाठिंबा मिळाला आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
630 हून अधिक महिला एकूण 130 गाड्यांसह या रॅलीत सहभागी झाल्या होत्या व त्यांनी या गाड्यांना चांगल्या पद्धतीने सजवले देखील होते. देशभक्ती ही यावर्षी रॅलीची थीम होती.अनेकांना सुरक्षा बलासारखे गणवेश परिधान केले होते तर, अनेकांनी देशभक्तीपर संदेश देखील लिहिले होते.चार महिलांच्या एका संघाने वायुदलाच्या पायलटच्या वेशात होत्या त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर, काहींच्या गाड्या या सुरक्षा बलातील गाड्यांसारख्या दिसत होत्या.काहींनी गाड्यांवर हाऊ इज द जोश ? तर, काहींनी आय लव्ह इंडिया असे लिहिले होते.
टीएसडी रॅली सकाळी सात वाजता ओमकार 1973 येथून सुरू झाली आणि सेंच्युरी बाजार, सिद्धिविनायक, शिवाजी पार्क, दादर प्लाझा, पूर्व दूर्तगती मार्ग, वाशी असे अंतर पार करत अँबी व्हॅली येथे रॅली संपली. या रॅलीला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चांगली गर्दी पाहायला मिळाली.