ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:44 PM2020-08-07T18:44:11+5:302020-08-07T18:46:10+5:30

जगभरातील हिंदूंसाठी 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरला.

Ram Mandir Bhoomi Pujan : This foundation stone has been placed on the chests of many; Babita Phogat  | ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

Next

मागील अनेक शतकं हिंदूच्या मनातील राम मंदिराच्या निर्मितीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली. राम मंदिर भूमीपूजन सोहळा 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला, यानिमित्ताने अनेकांनी जुन्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. राम मंदिर निर्माण भूमीपूजन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. या सुवर्णक्षणाचा जगभरातील हिंदूंनी आनंद साजरा केला. अमेरिकेतील टाईम स्क्वेअरवरही श्रीरामाची प्रतिमा झळकली. यानंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. भारताची कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटनं केलेलं एक ट्विट केलं आहे.

Big News : IPL 2020 यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती 

टीम इंडियाची सप्टेंबरमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय मालिका रद्द; बीसीसीआयची घोषणा

5 ऑगस्टला बबितानं ट्विट केलं होतं. ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने तिनं ट्विट केलं. ही तर सुरूवात आहे आणि यानंतर अजून बरंच काही होणार आहे, अशा आशयाचं तिनं ट्विट केलं. ''अयोध्या तो झांकी है, उसके बाद भी बहुत कुछ बाकी है,'' असे बबितानं ट्विट केलं. पुढे ती म्हणाली की,''पुन्हा एकदा वनवास संपला.. आपली श्रद्धा जिंकली आणि मोठ्या थाटात प्रभू राम परतले आहेत. त्यानं प्रत्येत हिंदूच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे.''

आज बबिता फोगाटनं ट्विट केलं की,''हा शिलान्यास अयोध्येसह अनेकांच्या छातीवरही ठेवला गेला आहे.'' तिच्या या ट्विटवरून आता नेटिझन्समध्ये जुंपली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी!

बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका

गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले

ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन 

Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला!

Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का! 

Web Title: Ram Mandir Bhoomi Pujan : This foundation stone has been placed on the chests of many; Babita Phogat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.