Ram Mandir Bhoomi Pujan: प्रभू श्रीरामापेक्षा मोदी मोठे आहेत का?; गीता फोगाटची नेटकऱ्यांकडून 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:40 PM2020-08-05T12:40:41+5:302020-08-05T12:41:27+5:30

Ram Mandir Bhumi Pujan : भारताची कुस्तीपटू गीता फोगाटनंही या ऐतिहासिक क्षणाचे अभिनंदन करताना एक पोस्ट केली. त्यावरून ती आता ट्रोल होत आहे.

Ram Mandir Bhumi Pujan: Is Modi bigger than Lord Rama ?; Indian Wrestler Geeta Phogat trolled | Ram Mandir Bhoomi Pujan: प्रभू श्रीरामापेक्षा मोदी मोठे आहेत का?; गीता फोगाटची नेटकऱ्यांकडून 'शाळा'

Ram Mandir Bhoomi Pujan: प्रभू श्रीरामापेक्षा मोदी मोठे आहेत का?; गीता फोगाटची नेटकऱ्यांकडून 'शाळा'

Next

केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. राम मंदिराच्या भूमी पूजन होत असल्यामुळे सोशल मीडियावरही शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताची कुस्तीपटू गीता फोगाटनंही या ऐतिहासिक क्षणाचे अभिनंदन करताना एक पोस्ट केली. त्यावरून ती आता ट्रोल होत आहे. (Ram Mandir Bhumi Pujan 

अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल

2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून गीतानं इतिहास रचला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून देणारी ती पहिली खेळाडू ठरली. शिवाय ऑलिम्पिकचे तिकीट पटकावणारीही ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिच्या या यशोगाथेवर 'दंगल' हा चित्रपट तयार करण्यात आला. गीतानं 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. शिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर दोन कांस्य, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक आहे.  
आज गीतानं एक ट्विट केलं. त्यात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यावरून ती ट्रोल झाली आहे. (Ram Mandir Bhumi Pujan )




 

आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात

 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी

 

Web Title: Ram Mandir Bhumi Pujan: Is Modi bigger than Lord Rama ?; Indian Wrestler Geeta Phogat trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.