रामबाबू हो गई चांदी...

By admin | Published: October 14, 2015 11:59 PM2015-10-14T23:59:21+5:302015-10-14T23:59:21+5:30

गेल्या वर्षीचा टी-२० विश्वचषक बांगलादेशात झाला होता. मोहालीचा रामबाबू तर अनेकांना आठवत असेल. धडधाकट पंजाबी शरीर. युवा टीम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी तो देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचतो.

Rambababu became silver ... | रामबाबू हो गई चांदी...

रामबाबू हो गई चांदी...

Next

सचिन कोरडे, गोवा
गेल्या वर्षीचा टी-२० विश्वचषक बांगलादेशात झाला होता. मोहालीचा रामबाबू तर अनेकांना आठवत असेल. धडधाकट पंजाबी शरीर. युवा टीम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी तो देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. बांगलादेशात त्याला डोक्यात ताप शिरला होता. वारंवार उलटीही करीत होता. ही गोष्ट कुणीतरी धोनीला सांगितली. तेव्हा कर्णधाराने आपल्या खर्चाने त्याला विमानाने नेले आणि दिल्लीत उपचार केले. तेव्हापासून हा पठ्ठा (रामबाबू) टीम इंडियासोबत हॉटेलमध्ये राहतो. आता तर तो टीमच्या चार्टर विमानाने इंदूरमध्ये आला आणि ‘रेडिसन ब्ल्यू’च्या सहाव्या मजल्यावर संघासोबत आहे. रामबाबू की चांदी...!
उमेशने बदलला नंबर
विदर्भ स्टार उमेश यादवने आपला नंबर बदलला. उमेश हा नागपूर पोलिसांत कॉन्स्टेबल होता. तो सरळ आणि साधा मनुष्य आहे. १५ वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ असेल की, त्याने आपला मोबाईल नंबर बदलला. त्याने जुना नंबर बंद केला. हा नंबर म्हणे, चहाच्या टपरीवाल्याकडे होता. उमेश फोन उचालायचा आणि त्याची डोकेदुखी वाढायची. अखेर त्रासून त्याने आता दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड घेतले आहे.
हॉटेल रेडिसनमध्ये टीम मीटिंग..
सरावानंतर रात्री उशिरा टीम मिटिंग झाली. ही मिटिंग हॉटेल रेडिसन येथे झाली. त्यात हरभजन सिंगचे खेळणे पक्के झाले होते. यात सर्वांत अधिक चर्चा रंगली ती गोलंदाजीवर. कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्षेत्रात गोलंदाजी करायची, यावर अधिक भर होता. मंगळवारी धोनीने गोलंदाजांना नेट प्रॅक्टिसही करू दिली नाही. ध्येय एकच होते की, सामन्यात गोलंदाज सर्व ताकदीने गोलंदाजी करतील. त्यामुळे गोलंदाज केवळ फुटबॉल खेळत होते.
खेळाडू दर्शनाला!
टीम इंडियातील सुरेश रैना, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा यांनी मंगळवारी इंदूर येथील प्रसिद्ध खजराणा गणेश मंदिर गाठले. त्यांनी विजयासाठी बाप्पांकडे प्रार्थना केली. रोहित, अजिंक्य आणि रैना जेव्हाही इंदूर येथे येतात, तेव्हा ते खजराणा येथील मंदिरात अवश्य जातात. या वेळी मात्र त्यांच्यासोबत राजू चिंतामन नव्हते. जे नेहमी त्यांना घेऊन जातात. त्यांचा सहकारी आणि मध्य प्रदेशचा गोलंदाज ईश्वर पांडे याने इनोव्हा गाडीत या सर्व खेळाडूंना नेले होते. गाडीची व्यवस्था माजी रणजीपटू करणसिंह शेखावतने केली होती.

Web Title: Rambababu became silver ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.