रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया
By admin | Published: July 14, 2017 09:33 PM2017-07-14T21:33:53+5:302017-07-14T21:33:53+5:30
अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणतुंगांनी अंतिम लढतीच्या चौकशीची केलेली मागणी ही अपमानकारक असल्याचे भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून मात केली होती.
रणतुंगा यांनी केलेल्या मागणीचा विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी खरपूस समाचार घेतला आहे. अंतिम लढतीत ९७ धावांची खेळी करत भारताच्या विश्ववियाची पायाभरणी करणाऱ्या गौतम गंभीरने रणतुंगांच्या वक्तव्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. "रणतुंगांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. हा आरोप अशा खेळाडूने केला आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मान दिला जातो. रणतुंगा यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजेत."
अधिक वाचा
( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
अधिक वाचा
( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
(बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी )
( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही हे आरोप फेटाळले आहेत. मी या आरोपांवर काही बोलून प्रकरण वाढवू इच्छित नाही. अशा चर्चांना अंत नसतो. आता मी जर १९९६ च्या श्रीलंकेच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ते चांगले वाटेल का, असा सवाल त्याने केला. पण रणतुंगांसारखा मोठा खेळाडू अशी वक्तव्ये करतो तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले. तर हरभजन सिंगने या प्रकरणी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.
रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.