रानिंदरसिंग यांची अध्यक्षपदी फेरनिवड
By admin | Published: July 9, 2017 02:44 AM2017-07-09T02:44:45+5:302017-07-09T02:44:45+5:30
माजी आंतरराष्ट्रीय ट्रॅप नेमबाज रानिंदरसिंग यांची राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) अध्यक्षपदी फेरनिवड झाली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन
चंदीगड : माजी आंतरराष्ट्रीय ट्रॅप नेमबाज रानिंदरसिंग यांची राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) अध्यक्षपदी फेरनिवड झाली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे पुत्र असलेले ४८ वर्षांचे रानिंदर यांनी मोहालीत शनिवारी झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी शामसिंग यादव यांचा ८९-१ असा दारुण पराभव केला. २०१० मध्ये देखील यादव हे अध्यक्षपदाच्या लढतीत रानिंदर यांच्याकडून पराभूत झाले होते.
महासचिवपदी डी. व्ही. सीताराम राव यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली. सिनियर उपाध्यक्ष म्हणून ओडिशातील बिजदचे खा. के. एन. सिंगदेव हे एकमताने निवडून आले. कोषाध्यक्षपदी करणकुमार निर्वाचित झाले. अध्यक्षांसह उपाध्यक्षपदाच्या आठ व सचिवांच्या सहा
पदांसाठी निवडणूक पार पडली. रानिंदर हे दिग्विजयसिंग यांच्या निधनानंतर संघटनेचे अध्यक्ष बनले होते.
(वृत्तसंस्था)
जीएसटीमुळे नेमबाजांच्या अडचणीत भर
रानिंदर यांनी शुटिंगसाठी आयात होणाऱ्या शस्त्रास्त्रांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. नव्या करामुळे देशसाठी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या नेमबाजांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगून ते म्हणाले,‘भारतीय नेमबाजांना अनेक शस्त्रे आयात करावी लागतात. ही शस्त्रे सीमा शुल्क यादीत करमुक्त होती. जीएसटीमुळे कर भरावा लागणार आहे. हा मुद्दा क्रीडा मंत्रालयामार्फत अर्थमंत्रालयाकडे लावून धरण्यात येईल.’ यावर लवकर तोडगा काढण्याचा मानस असून खेळ आणि खेळाडूंना त्रास होऊ नये, असा एनआरएआयचा हेतू असल्याचे रानिंदर यांनी राज्य संघटनांच्या प्रतिनिधींपुढे मनोगत व्यक्त करताना सांगितले.
नवनिर्वाचित समिती :
अध्यक्ष : रनिंदर सिंग;
वरिष्ठ उपाध्यक्ष : कलिकेश नारायण सिंग देव;
उपाध्यक्ष : अजय पटेल, व्ही. के. धल, अशोक पंडित, अमित संघी, पुतुल कुमारी एमपी, डेरिअस चेनई, जगमीत सिंग सेठी, सुषमा सिंग.
जनरल सेक्रेटरी : डी. व्ही. सिताराम राव. संयुक्त सचिव : पवन कुमार सिंग, विराज चोप्रा.
खजिनदार : करण कुमार
सचिव : शीला कनुंगो, मेघशाम श्रीपाद भांगळे, रचंद्र सिंग, इश्वर रोहल, भाबा कलिता, अशोक मित्तल.
कार्यकारिणी समिती : जे. एस. मरवाह, अशोक कुमार चॅटर्जी, अनंत कुमार सेन, जी. सुशील, नील सूटींक, आर. रविक्रिष्णन, सुभाष राणा, हरमन सिंग सेठी, जगदीप मढोक, जयेश मोदी, मेरंग जमिर, पवनप्रीत सिंग धिल्लोन, पीटर झोहमेनगैहा, शिवेंद्र भेल, सलालिथ टोत्तेमपुडी.